धुळ्यात "कंटेन्मेंट झोन'ची शंभरी पार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

धुळे शहरात 20 एप्रिलला कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. सुरवातीच्या काळात संसर्गाचा वेग कमी होता. यामुळे शहरातील कंटेन्मेंट झोनही कमी होते. 20 एप्रिल ते साधारण 31 मेपर्यंत शहरात 54 कंटेन्मेंट झोन होते.

धुळे : शहरात कोरोनाचा शिरकाव होऊन दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यांत कोरोना संसर्गाचा धोका कमी होण्याऐवजी वेगाने वाढत आहे. शहरातील कंटेन्मेंट झोनची स्थिती पाहिली, तर पहिल्या 40-42 दिवसांत "कंटेन्मेंट झोन' 50 पर्यंत पोहोचले होते. यानंतर एक जूनपासून पुढील फक्त 19 दिवसांत "कंटेन्मेंट झोन' शंभरीपार पोहोचले. यावरूनच कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतोय याची कल्पना यावी. सुरवातीला एक- दोन रुग्ण आढळले तरी अख्ख्या शहरात भीती पसरायची. आता एकाच दिवसात 25 रुग्ण आढळले तरी नागरिकांना गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. 

क्‍लिक करा - जिल्ह्यात उद्रेक सुरुच; कोरोनाचे 132 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

धुळे शहरात 20 एप्रिलला कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. सुरवातीच्या काळात संसर्गाचा वेग कमी होता. यामुळे शहरातील कंटेन्मेंट झोनही कमी होते. 20 एप्रिल ते साधारण 31 मेपर्यंत शहरात 54 कंटेन्मेंट झोन होते. त्यानंतरच्या काळात मात्र कोरोना विषाणूंचा संसर्ग वेगाने पसरला. एक ते 19 जूनदरम्यान कंटेन्मेंट झोनची संख्या 54 वरून आज 103 पर्यंत गेली. अर्थात, शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरच्या पहिल्या 40-42 दिवसांत 54 तर नंतरच्या केवळ 19 दिवसांत तब्बल 49 "कंटेन्मेंट झोन'ची भर पडली. दरम्यान, ज्या झोनमध्ये नवीन रुग्ण आढळला नाही ते झोन रद्द झाले आहेत. 

असे आहेत कंटेन्मेंट झोन 
कंटेन्मेंट झोन-101 (जयहिंद कॉलनी भूखंड क्रमांक-90) ः उत्तर- जयहिंद मुख्य रस्ता सुपर बाजार ते श्री. देशपांडे, मधुबन होस्टेलपर्यंत, पूर्व- मधुबन होस्टेल ते भूखंड क्रमांक-88 पर्यंत, पश्‍चिम- हॉटेल रेणुबाग ते जयहिंद मुख्य रस्ता सुपर बाजारपर्यंत. 
कंटेन्मेंट झोन-102 (टेलिफोन कॉलनी, गोंदूर रोड) ः उत्तर- आकाशदीप अपार्टमेंट ते श्री. भोंगे यांच्या घरापर्यंत, पूर्व- श्री. भोंगे यांचे घर ते श्रीराम मंदिरापर्यंत, दक्षिण- श्री. देशपांडे यांचे घर ते श्रीराम मंदिरापर्यंत, पश्‍चिम- श्री. देशपांडे यांचे घर ते आकाशदीप अपार्टमेंटपर्यंत. 
कंटेन्मेंट झोन-103 (साईदर्शन कॉलनी, मिल परिसर, चितोड रोड) ः उत्तर- बुद्धदर्शन निवास ते विठ्ठल चव्हाण यांच्या घरापर्यंत, पूर्व- नितीन गोकुळ महाजन यांचे घर ते लीलावती निवासपर्यंत, दक्षिण-लीलावती निवास ते कैलास नेरकर यांच्या घरापर्यंत, पश्‍चिम- कैलास नेरकर यांचे घर ते विठ्ठल चव्हाण यांच्या घरापर्यंत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule city corona virus contentment zone hundred cross