esakal | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सखूबाई पाटील स्थानबद्ध 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सखूबाई पाटील स्थानबद्ध 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे ः भूसंपादनात फळबागांचा मोबदला मिळत नसल्याने आणि पायऱ्या झिजवूनही न्याय मिळत नसल्याने विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेमुळे गुरुवारी (ता. 22) सायंकाळी दोंडाईचा दौऱ्यावर होते. तत्पूर्वीच, सखूबाई धर्मा पाटील यांना त्यांच्या निवासस्थानीच पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. 
 
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त सखूबाई पाटील (वय 72) आणि नरेंद्र धर्मा पाटील यांनी काही हालचाल करू नये म्हणून गुरुवारी सायंकाळी सहापासून त्यांना त्यांच्या निवासस्थानात स्थानबद्ध केले. दोन महिला पोलिस कर्मचारी तैनात होत्या. विखरणचे ग्रामस्थ महाजनादेश यात्रेसह मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी ही कार्यवाही केली. सखूबाई पाटील यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पतीच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय मिळाला नसल्याने श्रीमती सखूबाईंसह पाटील कुटुंबीय व्यथित आहे. मुख्यमंत्र्यांकडे केवळ न्यायासाठीच मागणी केली असती. असे असतानाही स्थानबद्धतेची कारवाई का, ती कुणाच्या दबावामुळे झाली का, असे प्रश्‍न पाटील कुटुंबीय उपस्थित करत आहेत. 

loading image
go to top