esakal | संचारबंदी, "सोशल डिस्टन्सींग'ची ऐशीतैशी 
sakal

बोलून बातमी शोधा

संचारबंदी, "सोशल डिस्टन्सींग'ची ऐशीतैशी 

शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी भाजीपाला, दूध, फळे विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. या सवलतीचा मात्र दुरुपयोग करत भाजीपाला-फळ विक्रेते एकाच ठिकाणी गर्दी करत असल्याने प्रशासकीय यंत्रणेपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले.

संचारबंदी, "सोशल डिस्टन्सींग'ची ऐशीतैशी 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः संचारबंदीच्या काळात भाजीपाला- फळे विक्रीसाठी शहरातील विविध भागात फिरता यावे यासाठी विक्रेत्यांना ओळखपत्र (पास) वितरित करण्यात येत आहे. हे ओळखपत्र घेण्यासाठी आज महापालिकेच्या जुन्या इमारतीत फेरीवाल्यांची गर्दी उसळली. या गर्दीमुळे मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदी व "सोशल डिस्टन्सींग'च्या उपाययोजनेचा बट्ट्याबोळ झाला. बाजार विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर आता देशभरात लॉक डाऊन झाले आहे. या काळात जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी अडथळा येणार नाही यासाठीही शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी भाजीपाला, दूध, फळे विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. या सवलतीचा मात्र दुरुपयोग करत भाजीपाला-फळ विक्रेते एकाच ठिकाणी गर्दी करत असल्याने प्रशासकीय यंत्रणेपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. यातून मार्ग काढण्यासाठी फेरीवाल्यांना तात्पुरत्या स्वरूपात ओळखपत्र देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार वाटप करण्यात येत आहे. 

ओळखपत्रासाठी उसळली गर्दी 
महापालिकेच्या बाजार विभागाने ओळखपत्र घेण्यासाठी फेरीवाल्यांना आज महापालिकेत बोलावले होते. या आवाहनामुळे फेरीवाल्यांची महापालिकेच्या जुन्या इमारतीत मोठी गर्दी उसळली. ओळखपत्रासाठी मोठी रांग लागली होती. त्यामुळे संचारबंदी आणि एकमेकांपासून अंतर ठेवा (सोशल डिस्टन्सींग) या उपाययोजनांचाही बट्ट्याबोळ झाला. 

गर्दीला काढले बाहेर 
मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने व ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या गर्दीला बाहेर काढावे लागले. आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, तुषार नेरकर, विनायक कोते आदी उपस्थित होते. 

ओळखपत्र वितरणासाठी पथक 
दरम्यान, आता शहरातील विविध भागात फिरणाऱ्या भाजीपाला-फळे विक्रेत्यांना त्या-त्या भागात जाऊन ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत एक पोलिस असे पथक नेमले आहेत. जे शहरात प्रत्यक्ष विक्रीसाठी फिरत आहेत. अशाच फेरीवाल्यांना हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. 

loading image