esakal | अरे बापरे ! नविन व्हायरस, खानदेशातील कारले उत्पादक शेतकरी संकटात  
sakal

बोलून बातमी शोधा

अरे बापरे ! नविन व्हायरस, खानदेशातील कारले उत्पादक शेतकरी संकटात  

काही दिवसांनी जास्त पावसामुळे कारल्यावर पांढरी माशी. मावा,तुडतुडे,यांच्या प्रादुर्भाव (Yellow mosaic virus ) दिसुन येत आहे,

अरे बापरे ! नविन व्हायरस, खानदेशातील कारले उत्पादक शेतकरी संकटात  

sakal_logo
By
विनोद शिंदे

कुंसुबा जि.धुळे : एकीकडे सारे जग कारोना व्हायरस सोबत लढत आहे. त्यातच खान्देशातील शेतकरी विशेषतःकारले उत्पादक शेतकरी कारल्यावर आलेल्या व्हायरस मुळे मेटाकुटीस आले आहेत.


धुळे,नंदुरबार,जळगांव भागात पावसाचे प्रमाण जास्त होत असल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे कृषी तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. या भागांतील वेलवर्गीय कारल्याच्या पिकाची 1 महिना पूर्ण अपेक्षित अशी वाढही झाली,उत्तम पावसामुळे फुल देखील उत्तम रित्या आले, मात्र काही दिवसांनी जास्त पावसामुळे कारल्यावर पांढरी माशी. मावा,तुडतुडे,यांच्या प्रादुर्भाव (Yellow mosaic virus ) दिसुन येत आहे,

कारल्यावर आलेल्या व्हायरस मुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून आर्थिक कंबरडे मोडले आहे. कारल्यावर व्हायरस चे वेक्टर म्हणून हे कार्य करू लागले या सर्व कारणास्तव शेतकऱ्यांवर कारले पीक उपटून फेकण्याची वेळ आली .कारण आज पर्यंत व्हायरस वर यथायोग्य संशोधन कुटे तरी कमी पडलं आहे,या व्हायरस मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर येऊन ठेपले आहे , शेतकऱ्यांवर आज हे पीक उपटून फेकण्याची वेळ आली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

जास्त पावसामुळे विशेषतः सततच रिपरिप पाऊस ढगाळसदृष्य वातावरणामुळे पांढरी माशीचा प्रादुर्भाव कारले पिकांवर दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी निबोंळी अर्क वापरून त्यावर नियंत्रण मिळवावे .
- शुभम शिंदे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष धुळे, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य 

संपादन- भूषण श्रीखंडे