esakal | "कोरोना'मुळे धुळेकर "सीसीटीव्ही'च्या भूमिकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

cctv

"कोरोना'च्या संशयाने त्या-त्या भागातील नागरिकच महापालिकेच्या यंत्रणेला फोन करून संबंधितांबद्दल तक्रार करत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेला अशा बाहेरून आलेल्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

"कोरोना'मुळे धुळेकर "सीसीटीव्ही'च्या भूमिकेत 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर देश- परदेशातून तसेच राज्यभरातून धुळे शहरासह जिल्ह्यात आपापल्या मूळ गावी परतलेल्या अनेकजणांना सध्या आपल्या मूळ गावातच "माहेरपणा'च्या प्रेमाऐवजी "परकेपणा'चा सामना करावा लागत आहे.

"कोरोना'च्या संशयाने त्या-त्या भागातील नागरिकच महापालिकेच्या यंत्रणेला फोन करून संबंधितांबद्दल तक्रार करत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेला अशा बाहेरून आलेल्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 
तक्रारींमुळेच कालपर्यंत 10 "होम क्वारंटाईन'चा आकडा आज 25 वर गेला आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी न करण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत अनेक धुळेकर नागरिक संचारबंदीतही बिनधास्त फिरत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या धोक्‍याचे गांभीर्य ओळखून धास्तावलेला वर्गही मोठा असल्याचे चित्र समोर येत आहे. धुळे शहरात देश-परदेशातून तसेच राज्यातील विविध भागातून अनेक नागरिक आले. यातील बऱ्याचजणांनी ही माहिती लपविल्याने त्या- त्या भागात भीती आहे. त्यामुळे कॉलनीत, परिसरात बाहेरून आलेली व्यक्ती बिनधास्त फिरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे होत आहेत. त्याची दखल घेत आरोग्य विभागाचे पथक लगेचच संबंधितांकडे जाऊन माहिती घेत आहे. यासाठी महापालिकेने दहा पथके नेमली आहेत. संबंधितांची संपूर्ण माहिती, मेडिकल हिस्टरी घेऊन त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. 

दक्षतेचाही अतिरेक ? 
नगावबारी भागात बाहेरून आलेल्या एका नागरिकाला "होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीने स्वतःला घरातच कोंडून घेतले आहे. दक्षता म्हणून त्यांनी आपल्या सर्व कुटुंबालाही दुसऱ्या घरात शिफ्ट केले आहे. जेवणाचा डबाही वडिलांना पायरीवर ठेवून जायला सांगितले आहे. मात्र, तरीही परिसरातील नागरिक या व्यक्तीबद्दल मनपाकडे वारंवार तक्रारी करत असल्याने ती व्यक्ती हताश आहे. 
 

loading image