esakal | कोरोना विषाणू विरूद्ध लढाईतील सेनानी : डॉ. आर. टी. बोरसे
sakal

बोलून बातमी शोधा

dr borse

ससून रूग्णालयात पाॅझिटिव्ह व निगेटिव्ह दोन्ही रूग्णांची तपासणी रिपोर्ट कामे केली जातात. दोन्ही वार्ड वेगळे आहेत. रूग्णांचा एकमेकांशी कोणताच संबंध नाही. डाॅ.बोरसे नायडू रूग्णालयात पाॅझिटिव्ह रूग्णांचे काम पाहतात.

कोरोना विषाणू विरूद्ध लढाईतील सेनानी : डॉ. आर. टी. बोरसे

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अंगाचा थरकाप उडविणार्या धोकादायक लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून अथक परिश्रमाने रूग्णसेवा करून कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांना अंधारातून उजेडात आणण्याचे काम नेर (ता.धुळे)चे भूमिपुत्र तथा पुणे बी.जे.मेडिकल कॉलेज, ससून रूग्णालयाचे प्राध्यापक, पथप्रमुख व नायडू रूगणालयातील पाॅझिटिव्ह कक्षाचे प्रमुख डॉ.आर.टी.बोरसे करीत आहेत.

नक्‍की पहा - जिल्हा बॅंकतर्फे १५ पासून एटीएमद्वारे पीककर्ज देणार

मानवतेचा दृष्टीकोन, आत्मविश्वास बळावर दररोज कोरोना रूग्णांना सामोरे जात आहेत. सर्वांच्या मदतीने देश ही लढाई नक्की जिंकेल. असा विश्वास त्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. यामुळे आम्हा सर्वांचे मनोबल वाढले आहे. धुळे जिल्हा मेडिकल कॉलेजला 13 वर्ष काम केले आहे. देऊर, नेर म्हसदी भागात होम टू होम वैद्यकीय सेवा त्यांनी केली आहे. सर्वांसाठी अभिमानास्पद असे वैद्यकीय काम डॉ. बोरसे यांचे आहे. याविषयी त्यांनी 'सकाळ' शी केलेला वार्तालाप..
ससून रूग्णालयात पाॅझिटिव्ह व निगेटिव्ह दोन्ही रूग्णांची तपासणी रिपोर्ट कामे केली जातात. दोन्ही वार्ड वेगळे आहेत. रूग्णांचा एकमेकांशी कोणताच संबंध नाही. डाॅ.बोरसे नायडू रूग्णालयात पाॅझिटिव्ह रूग्णांचे काम पाहतात. अद्याप कुठलेही रूग्ण येथे गंभीर झाले नाही. 14 दिवस विशेष निगराणीत पाॅझिटिव्ह रूग्णांना ठेवतो. 14,15,16 व्या दिवसापर्यंत तपासणी केल्या जातात. 24 तासाच्या अंतराने तपासणी होते. निगेटिव्ह रूग्णांना डिस्जार्ज दिला जातो. शरीरात एखादा विषाणू राहिला तर जीवघेणा ठरू शकतो. इतरांना त्रास होऊ नये. म्हणून होम क्वारंटाईन सक्तीचे आहे. 
नायडू हाॅस्पिटलचा एक मेडिकल ऑफिसरचा ग्रुप दुसरा ससून रूग्णालयात पाॅझिटिव्ह रूग्णांवर उपचार करणारा ग्रुप आहे. मेडिसीन, प्रमोमेडिसीन, अनसथेस्थीया असे तीन गटात काम केले जाते. गटानुसार रूग्णांची तपासणी एकमेकांशी मार्गदर्शन घेऊन करतो. सध्या स्थितीत 80 टक्के लोकांमध्ये सौम्य प्रकारचे रूप कोरोनाचे आहे. पाच टक्के लोकांमध्ये अतिशय कडक प्रकाराचा त्रास याचा आहे. 

घरातच राहा, हाच कोरोनावर रामबाण उपाय 
रूग्णाची वैद्यकीय तपासणी करतांना रिस्क आहे. मात्र प्रोटेक्शनने तपासणी करावी लागते. मागचा अनुभव प्लेग, स्वाईन फ्लू साथींचा पाठिशी आहे. सर्वांच्या आशिर्वादाने काम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करा. कोरोनाला आपण हारवू शकतो. हा विषाणू स्वतःहून कधीही कुणाकडेच चालून येऊ शकत नाही.आपण स्वतः ओढवून घेतो. त्यामुळे निश्चय करा. एकच मार्ग घराच्या बाहेर पडू नका. प्रतिजैविक कुठलेही औषध,उपचार नाही. पंधरा दिवसात रूग्णांची संख्या वाढली तर आश्चर्य वाटायला नको. शेतकरी, शेतमजूरांनी काही त्रास होत नाही. असे दुर्लक्षित करू नका. संपर्काच्या दृष्टीने मास्क लावा. हात वारंवार धुवा. काळजी स्वतःची घ्या.

loading image