शिष्यवृत्तीची रक्‍कम कोरोनाग्रस्तांच्या मदतीला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

म्हसदी (ता. साक्री) येथील गंगामाता कन्या विद्यालयातील सहावीची विद्यार्थिनी पूर्वा प्रदीप नेरकरने शिष्यवृत्तीसाठी मिळालेले 12 हजार रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी दिले. 

देऊर ः "कोरोना'च्या मुकाबल्यासाठी प्रत्येकजण लढत आहे. पण एका विद्यार्थीनीने बारा हजार रूपयांची मिळालेली शिष्यवृत्तीची रक्‍कम कोरोनाच्या लढ्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. वसमार (ता. साक्री) येथील रहिवासी व म्हसदी (ता. साक्री) येथील गंगामाता कन्या विद्यालयातील सहावीची विद्यार्थिनी पूर्वा प्रदीप नेरकरने शिष्यवृत्तीसाठी मिळालेले 12 हजार रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी दिले. 

कोरोना संकटाचा मुकाबलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत निधीसाठी आवाहन केले होते. यात अनेकजण योगदान देत भरीव मदत करत आहेत. मात्र वसमार (ता.साक्री) येथील व म्हसदी गंगामाता कन्या विद्यालयात शिक्षण घेणारी पूर्वा प्रदीप नेरकर हिने शिष्यवृत्तीसाठी मिळालेली बारा हजार रुपयांची रक्कम थेट पंतप्रधान सहायता निधी "कोविड 19' रिलिफ फंडासाठी धनादेशाद्वारे दिली आहे. पूर्वाने केलेली मदत आगळीवेगळी ठरली आहे. वास्तविक आयकरमध्ये कुठलेही सूट नसतांना स्वयंप्रेरणेने दिलेली आर्थिक मदत इतरांसाठी आदर्शवत आहे. 

तांदूळही दिला गरीब कुटूंबाला 
शिष्यवृत्तीची रक्‍कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली. ऐवढ्यावरच थांबली नाही, तर शालेय पोषण आहारात मिळालेला तांदूळ देखील वसमारच्या गरीब कुटुंबाला दिला. अतिशय सामान्य परिस्थिती असलेल्या नेरकर कुटुंबांचे मदतीचे पाऊल परिसरासाठी प्रेरणादायी आहे. या निर्णयाचे स्वागत परिसरातून होत आहे. प्रज्ञाने हा आदर्श वसमार येतील जेष्ठ अंगणवाडी सेविका निर्मलाबाई साहेबराव नेरकर यांच्याकडून घेतला. वसमारचे प्रगतीशील युवा शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप साहेबराव नेरकर व म्हसदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा गट प्रवर्तक सुवर्णा नेरकर यांची कन्या आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona girl shishrutti nidhi donet cm fund covid