esakal | धुळे जिल्ह्यात कारोनाचे नवे १३ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात कारोनाचे नवे १३ पॉझिटिव्ह 

नवीन बाधितांबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आजअखेर १४ हजार ५९६ वर पोहोचली आहे. 

धुळे जिल्ह्यात कारोनाचे नवे १३ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः जिल्ह्यात सोमवारी (ता. ११) नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या नवीन बाधितांबरोबरच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आजअखेर १४ हजार ५९६ वर पोहोचली आहे. 

आवश्य वाचा- लॉकरमध्ये विसरले ८० ग्रॅमचे सोने; पण प्रामाणिकतेमूळे मूळ मालकाला पून्हा मिळाले  


 

सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः धुळे जिल्हा रुग्णालय (८० पैकी एक), शिरपूर उपजिल्हा रुग्णालय (३६ पैकी एक, रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे तीनपैकी शून्य), दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय (१७ पैकी एक), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (१०२ पैकी एक, रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे तीनपैकी शून्य), धुळे महापालिका (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे १५४ पैकी दोन), प्राथमिक आरोग्य केंद्र मुकटी, आर्वी, नगाव, शिरुड (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे १८० पैकी शून्य), धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१६ पैकी एक), एसीपीएम लॅब (दोनपैकी एक), खासगी लॅब (३२ पैकी पाच). 

loading image