esakal | धुळ्यात आज चार कोरोना बाधितांचा मृत्यू, १५५ नवे बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात आज चार कोरोना बाधितांचा मृत्यू, १५५ नवे बाधित 

मृतांमध्ये धुळे शहरातील ६७ वर्षीय महिला व ७० वर्षीय पुरुष, वलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष व दरणे (ता. शिंदखेडा) येथील ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

धुळ्यात आज चार कोरोना बाधितांचा मृत्यू, १५५ नवे बाधित 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर १५५ नवीन बाधित आढळले. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या ३२० झाली. बाधितांच्या आकड्याने साडेदहा हजाराचा टप्पाही पार केली. दरम्यान, काल (ता.१०) आठ मृत्यू तर १४१ बाधित आढळले होते. यातील तब्बल २३ रुग्ण जिल्हा कारागृहातील आहेत. 

जिल्ह्यात शुक्रवारी १५५ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दोन व खासगी रुग्णालयात दोन अशा चार बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये धुळे शहरातील ६७ वर्षीय महिला व ७० वर्षीय पुरुष, वलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष व दरणे (ता. शिंदखेडा) येथील ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या चार मृत्यूंमुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ३२० झाली. 

१५५ नवीन रुग्ण 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर, खासगी लॅब आदी ठिकाणी एकूण ७१६ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यातील १५५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ६५५ वर पोहोचली. शुक्रवारी (ता.११) जिल्ह्यातील बाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (१९३ पैकी ४५), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (८५ पैकी ११), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (९८ पैकी १९), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर ( रॅपिड अँटीजन टेस्टचे १० पैकी ०३), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (रॅपिड अँटीजन टेस्टचे ३३ पैकी ४), महापालिका पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटर (१४४ पैकी १३), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (४६ पैकी ३), खाजगी लॅब (१०७ पैकी ५७). 


 संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top