esakal | अन पोलिस दादा गावात फिरते पथानाट्य करू लागले
sakal

बोलून बातमी शोधा

अन पोलिस दादा गावात फिरते पथानाट्य करू लागले

स्वतः कोरोना विषाणूचा पेहराव करून संपूर्ण नेर गावातील ग्रामस्थांना तसेच महिलांना कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी कलाकृती करून चालते पथनाट्य केले.

अन पोलिस दादा गावात फिरते पथानाट्य करू लागले

sakal_logo
By
सुरज खलाणे

नेर ः नेर येथील कोरोना बांधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थीती चितांजणक झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती पसरविण्यासाठी नेर गावातील पोलिस कर्मचाऱयाने विडा अचलून गावात कोरोना विषाणूचा पेहराव घालून पथनाट्यातून गावात जनजागृती करत आहे.

नेर येथे काही दिवसापासून कोरोना संक्रमित विषाणूचा मोठा प्रसार होत आहे.सध्या गावात पन्नास ते साठ रुग्ण कोरोना संक्रमित झाले आहे.तसेच दररोज या संख्येचे वाढते प्रमाण आहे.यासाठी नेर ग्रामपंचायत तसेच पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते हे गावासाठी तसेच गावात या कोरोनाची वाढती संख्या थांबविण्यासाठी उपाययोजना करत आहेत. परंतु काही गावातील ग्रामस्थ व व्यावसायिक मात्र दिलेल्या सूचनांना पाठ फिरवीत आहेत. शेवटी नेर गावाचे रहिवाशी व धुळे आझाद नगर पोलीस स्टेशन याठिकाणी कर्तव्य बजावनारे पोलीस कर्मचारी चेतन माळी हे आपले दैनंदिन कर्तव्य बजावत नेर गावात समाजसेवा करत आहे. ते स्वतः कोरोना विषाणूचा पेहराव करून संपूर्ण नेर गावातील ग्रामस्थांना तसेच महिलांना कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी कलाकृती करून चालते पथनाट्य केले.या पथनाट्यातून त्यांनी ग्रामस्थांना कोरोना हा विषाणू कसा असतो व हा आपल्यापर्यंत कसा पोहचतो. आपल्यामुळे याचा प्रसार कसा होतो. विषाणूच्या बचावासाठी आपण काय दक्षता घ्यावी. हे कलाकृतीतुन लाऊड स्पीकरच्या साहाय्याने संपूर्ण गावात चेतन माळी यांनी पथनाट्य केले. या उपक्रमातुन निश्चितच नेर ग्रामस्थ स्वतःची व इतरांची काळजी घेतील. नेर येथील सरपंच शंकरराव खलाणे यांनी तसेच ग्रामस्थांनी चेतन माळी यांचे कौतुक केले.


सरपंच शंकरराव खलाणे,कोरोना समितीचे पदाधिकारी तसेच कोरोना योद्धा,पोलीस मित्र,पोलीस पाटील विजय देशमुख,रतिलाल वाघ,राजेंद्र मगरे,व गोरख पगारे यांनी संपूर्ण नेर गाव आठ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या बघता गाव 24 ऑगस्ट ते 31ऑगस्ट या आठ दिवसासाठी गाव बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.गावातील अत्यावश्यक सुविधा त्यात दवाखाने,मेडिकल,व किराणा दुकाने विशिष्ट वेळेसाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र इतर कोणत्याही व्यावसायिकांनी आपली दुकाने खुली करू नये.अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.व विविध चौकात गर्दी दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.असे आदेश संपूर्ण गावात दवंडी देऊन करण्यात आले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image