esakal | धुळे जिल्ह्यात नवे 19 कोरोना "पॉझिटिव्ह' 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील प्राप्त अहवालानुसार गल्ली क्रमांक चारमधील एक, जिल्हा शासकीय रुग्णालयातील 58 पैकी आठ अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आले.

धुळे जिल्ह्यात नवे 19 कोरोना "पॉझिटिव्ह' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या दोघांसह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 19 रुग्ण आज आढळले. त्यामुळे जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 422 वरून 441 झाली. तसेच सोमवारी मध्यरात्रीनंतर बाधित तिघांचा मृत्यू झाला. 
हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील प्राप्त अहवालानुसार गल्ली क्रमांक चारमधील एक, जिल्हा शासकीय रुग्णालयातील 58 पैकी आठ अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात रमापती चौकातील 21 व 41 वर्षीय पुरुष, देवपूरमधील दत्तमंदिर परिसरातील सरस्वती कॉलनी भागामधील 65 वर्षीय महिला, शिवाजीनगरमधील 56 वर्षीय महिला, एकतानगरमधील तिघे आणि फागणे (ता. धुळे) येथील सात वर्षीय मुलगी, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे 15 पैकी सात अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात करवंद येथील समर्थ कॉलनीतील 11 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, तसेच पाटीलवाडा, वरवाडेतील फुलेनगर, फुले चौक, कुंभारटेक, आर. सी. पटेल कॉलनीतील सरासरी 40 ते 60 वयोगटातील स्त्री, पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील सातपैकी विद्या कॉलनीतील 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला. 
त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे. या एकूण बाधित 17 रुग्णांव्यतिरिक्त शिरपूर येथील एक, तर धुळे शहरातील देवपूर क्षेत्रामधील दत्तमंदिर चौकातील ठेकेदार परजिल्ह्यात उपचार घेत असल्याने दोघे बाधित मिळून आजची रुग्ण संख्या 19 झाली. 

31 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात दिवसभरात 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 278 जण कोरोनामुक्त झाले असून आज महापालिका क्षेत्रातील चार, शिरपूर व शिंगावेमधील 13, दोंडाईचा रुग्णालयातील 9 आणि भाडणे (ता. साक्री) केंद्रातील 5 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना सुटी देण्यात आली. 

तिघांचा मृत्यू 
जिल्ह्यात कोरोनामुळे महापालिका क्षेत्रात 19, तर उर्वरित ग्रामीण भागात 23, असे एकूण 42 जणांचा बळी गेला आहे. त्यात सोमवारी मध्यरात्री शिरपूर येथील 67 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, तर धुळे शहरातील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. विविध सरकारी रुग्णालय, कोविड केअर केंद्रात 121 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 239 रुग्ण आढळले असून 53 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 167 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित जिल्ह्यात आतापर्यंत 202 रुग्ण आढळले असून बाधित 68 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

loading image
go to top