जवानासह 83 वर्षीय आजी; सून, मुलगाही "कोरोना'मुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

आजीसह सून, मुलगा "कोरोना'मुक्त झाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात आतापर्यंत 66 रुग्ण आढळून आले. पैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

धुळे : ससंर्गजन्य कोरोना विषाणूवर मात करीत जिल्ह्यातील आणखी चार रुग्ण आज सायंकाळी आपापल्या घरी परतले. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. यात 83 वर्षीय आजीने "कोरोना'वर विजय मिळविला आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाचा एक जवानही कोरोनामुक्त झाला. त्यांना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून आज सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. 

आजीसह सून, मुलगा "कोरोना'मुक्त झाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात आतापर्यंत 66 रुग्ण आढळून आले. पैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. आजचे चौघे मिळून आतापर्यंत 22 रुग्ण "कोरोना'मुक्त झाल्याने घरी परतले आहेत. या बाधितांचे उपचारानंतर चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मलकुमार रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते. स्थितीवर पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, सीईओ वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदी लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे, घरातच सुरक्षित राहावे. अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona virus old women and other three parson nigetive