esakal | धुळ्यात नऊ मृत्यू, बाधितांचा आकडा दहा हजाराच्‍या टप्‍प्‍यावर
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

जिल्हाभरात ‘कोरोना’बाधितांसह मृत्यूच्या आकड्याने चिंतेत भर पडली आहे. 
जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांसह ‘कोरोना’मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नऊ ‘कोरोना’बाधितांचा रविवारी (६ सप्टेंबर) मृत्यू झाला.

धुळ्यात नऊ मृत्यू, बाधितांचा आकडा दहा हजाराच्‍या टप्‍प्‍यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : ‘कोरोना’मुळे रविवारी (६ सप्टेंबर) तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अडीचशे नवे बाधित समोर आले. दररोज वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येने आता दहा हजारांच्या टप्प्याकडे धाव घेतली आहे. ‘कोरोना’मुळे बळींचा आकडाही २८६ वर पोहोचला. त्यामुळे जिल्हाभरात ‘कोरोना’बाधितांसह मृत्यूच्या आकड्याने चिंतेत भर पडली आहे. 
जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांसह ‘कोरोना’मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नऊ ‘कोरोना’बाधितांचा रविवारी (६ सप्टेंबर) मृत्यू झाला.

मृतांमध्ये तिखी (ता. धुळे) येथील ६० वर्षीय महिला, रमाबाई आंबेडकर नगर, धुळे येथील ४२ वर्षीय महिला, गोंडे (ता. साक्री) येथील ६८ वर्षीय पुरुष, सुभाषनगर, धुळे येथील ४२ वर्षीय महिला, मुकटी (ता.धुळे) येथील ३६ वर्षीय महिला, रमेशनगर चितोड येथील ६१ वर्षीय पुरुष, राज कॉलनीतील ६५ वर्षीय महिला, मोहाडी धुळे येथील ६५ वर्षीय महिला, धुळ्यातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या नऊ मृत्यूंमुळे जिल्ह्यातील ‘कोरोना’बळींची संख्या २८६ झाली. यात धुळे महापालिका क्षेत्रातील १३१ व उर्वरित जिल्ह्यातील १५५ जणांचा समावेश आहे. 

अडीचशेवर नवे बाधित 
दरम्यान, एकाच दिवसात नऊ मृत्यूंबरोबरच रविवारी (ता.६) जिल्ह्यातील २४९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यात जिल्हा रुग्णालय धुळे (३८६ पैकी ८८), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (रॅपिड अँटीजन टेस्टच्या ४९ पैकी ८), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (२५ पैकी ३), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर ६० पैकी १७), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (४६ पैकी २४), महापालिका पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटर (४७ पैकी ३०), खाजगी लॅब ( १५५ पैकी ७९) अहवाल पॉझिटिव्ह आले. या नवीन कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता एकूण नऊ हजार ८७२ झाली.