esakal | सफाई कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन भत्ता! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत आरसीएच-२ अभियानातील १४ पैकी १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा प्रोत्साहन भत्ता देण्याचा विषय मंजूर झाला.

सफाई कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन भत्ता! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोनाच्या संकटात जोखीम पत्करून सेवा बजावणाऱ्या प्रजनन व बालआरोग्य (आससीएच-२) अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर अशी जोखीम सफाई कर्मचाऱ्यांनीही पत्करली आहे. त्यांनाही असा लाभ देण्याच्या अनुषंगाने स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन भत्ता मिळेल अशी अपेक्षा आहे. 
कोविड-१९ उद्रेकाच्या काळात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या निधीतून प्रोत्साहन भत्ता देण्याचा विषय महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत आरसीएच-२ अभियानातील १४ पैकी १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा प्रोत्साहन भत्ता देण्याचा विषय मंजूर झाला. याच विषयाच्या अनुषंगाने स्थायी समिती सभापती श्री. बैसाणे यांनी कोरोनाच्या संकटात सफाई कर्मचाऱयांनीही जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत का ? अशी विचारणा करत त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यावर उपायुक्त शांताराम गोसावी यांनी सभेतच तसा शासन निर्णय असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या लक्षात आणून दिले होते. 

असा आहे शासन निर्णय 
कोविड-१९ च्या अनुषंगाने नागरी भागात काम करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील संबंधित कर्मचारी, नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, कोविड-१९ च्या अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा कार्यकर्त्या अशा सर्व कर्मचारी जोखीम पत्करून काम करत असल्यामुळे त्यांना नियमित वेतन मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम १२ व्या, १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून देण्यात यावी असा शासन आदेश १४ सप्टेंबरला नगर विकास विभागाने काढला आहे. 

सफाई कर्मचाऱयांनाही अपेक्षा 
शासन निर्णयाचा संदर्भ व स्थायी समिती सभेत झालेली चर्चा लक्षात घेता आपल्यालाही प्रोत्साहन भत्ता मिळेल अशी अपेक्षा कोविड-१९ संकटात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आहे. प्रशासनाकडून शासन निर्णयाचा अभ्यास व त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image