धुळ्यात कोरोनापूर्वीचे मृत्यूही ‘अंजन’ घालणारे 

धुळ्यात कोरोनापूर्वीचे मृत्यूही ‘अंजन’ घालणारे 



धुळे ः जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन साधारण आठ महिने होत आले. या महाभयानक समजल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूने जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ बळी घेतले. यातील १६७ बळी धुळे शहरातील आहेत. बळींचा हा आकडा निश्‍चितपणे वेदनादायी आहे. मात्र, दुसऱ्या अंगाने विचार केला तर कोरोनाचे संकट नसतानाही शहरात मृतांचा आकडा मोठा होता. कोरोना काळातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत एकूण मृत्यूचे आकडे मोठे आहेत, यात शंका नाही; पण त्यापेक्षा जास्त मृत्यू लगतच्याच वर्षातील काही महिन्यांत पाहायला मिळतात, हे विशेष. 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल २०२० मध्ये आढळला होता. त्यानंतर हे संकट अधिक घट्ट होत गेले. या संकटाने प्रथम धुळे शहरवासीय व नंतर संपूर्ण जिल्हावासीयांना कवेत घेतले. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हावासीयांसह संपूर्ण शासकीय यंत्रणा हैराण आहे. संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३७७ बळी घेतले आहेत. यात धुळे शहरातील १६७, तर उर्वरित जिल्ह्यातील २१० जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे तब्बल ३७७ जणांचा बळी जाणे निश्‍चितपणे वेदनादायी, त्या-त्या कुटुंबांचा आधार या संकटाने हिरावला आहे. संसर्गाचा धोका कायम असल्याने चिंताही कायम आहे. ही चिंता कायमची दूर करण्यासाठी सर्वांनी दक्षता घेण्याची, यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे. 

उच्चांकी मृत्यू 
२०१६ ते २०२० या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता कोरोना संकट काळातील मृतांच्या आकड्यापेक्षाही जास्त मृत्यू त्यापूर्वीच्या चार वर्षांतील काही महिन्यांत आढळून येतात. यात सर्वाधिक डिसेंबर २०१७ मध्ये तब्बल एक हजार ३३२ मृत्यूंची नोंद आहे. जुलै २०१८ मध्ये ६१९, जानेवारी २०१९ मध्ये ६१७ मृत्यूंची नोंद आहे. कोरोना काळात अर्थात या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ५६९ मृत्यूंची नोंद आहे. 

पाच वर्षांतील मृत्यू (एप्रिल ते सप्टेंबर) 
२०१६ ... २२०९ 
२०१७ ... १३६६ 
२०१८ ... २११९ 
२०१९ ... २१२१ 
२०२० ... २४०६ (कोरोनाचा काळ) 

पाच वर्षांतील एकूण मृत्यू २०१६... 

महिना ... स्त्री ... पुरुष ... एकूण 
जानेवारी...९६...१३६...२३२ 
फेब्रुवारी...१२४...१८९...३१३ 
मार्च...१३०...१८२...३१२ 
एप्रिल...१२४...१९९...३२३ 
मे...२०५...२५०...४५५ 
जून...१३०...१७३...३०३ 
जुलै...१४०...१९६...३३६ 
ऑगस्ट...१९६...२८४...४८० 
सप्टेंबर...१३०...१८२...३१२ 
ऑक्टोबर...१२१...१६६...२८७ 
नोव्हेंबर...१०६...१७४...२८० 
डिसेंबर...१३९...२४७...३८६ 
एकूण...१६४१...२३७८...४०१९ 

२०१७... 
महिना...स्त्री...पुरुष...एकूण 
जानेवारी... ७१...१३४...२०५ 
फेब्रुवारी...८९...११६...२०५ 
मार्च...१०१...१४१...२४२ 
एप्रिल...९२...१३३...२२५ 
मे..१११...१५१...२६२ 
जून...६८...१०९...१७७ 

जुलै...११२...१५४...२६६ 
ऑगस्ट...७४...१३८...२१२ 
सप्टेंबर...९८...१२६...२२४ 
ऑक्टोबर...८५...१६१...२४६ 
नोव्हेंबर...१३५...२१९...३५४ 
डिसेंबर...५६७...७६५...१३३२ 
एकूण.......................३९५० 

२०१८... 
महिना...स्त्री...पुरुष...एकूण 
जानेवारी... ११४...१५७...२७१ 
फेब्रुवारी...११८...१९५...३१३ 
मार्च...११४...२०१...३१५ 
एप्रिल...११२...१४३...२५५ 
मे...१२६...१७८...३०४ 
जून...११८...१९९...३१७ 
जुलै...२३४...३८५...६१९ 
ऑगस्ट...१३९...१९९...३३८ 
सप्टेंबर...१२६...१६०...२८६ 
ऑक्टोबर...००...००...२९९ 
नोव्हेंबर...००...००...३०१ 
डिसेंबर...१३१...१६९...३०० 
एकूण......................३९१८ 

२०१९... 
महिना...स्त्री...पुरुष...एकूण 
जानेवारी... २५३...३६४...६१७ 
फेब्रुवारी...११६...१६५...२८१ 
मार्च...१४२...१९९...३४१ 
एप्रिल...१८४...२८०...४६४ 
मे...१२५...१९०...३१५ 
जून...१३८...१७०...३०८ 
जुलै...१२७...१८०...३०७ 
ऑगस्ट...१७०...२३७...४०८ 
सप्टेंबर...१२०...१९९...३१९ 
ऑक्टोबर...१६१...२४१...४०२ 
नोव्हेंबर...१३९...२१८...३५७ 
डिसेंबर...१३९...२२२...३६१ 
एकूण......................४४८० 

२०२०... 
महिना...स्त्री...पुरुष...एकूण 
जानेवारी... १७३...२८४...४५७ 
फेब्रुवारी...१२३...१६३...२८६ 
मार्च...८२...१५७...२३९ 
एप्रिल...११५...१२९...२४४ 
मे...१५६...१९४...३५० 
जून...१३३...२२२...३५५ 
जुलै...१५१...२५८...४०९ 
ऑगस्ट...१८४...२९५...४७९ 
सप्टेंबर...२०७...२६२...५६९ 
ऑक्टोबर... उपलब्ध नाही 
नोव्हेंबर...उपलब्ध नाही 
एकूण.....................२८१९ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com