esakal | सी. आर. पाटलांचे गिफ्ट..आणि लेकीने गाजवला धुळे जिल्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Dharti Nikhil Deore

सी. आर. पाटलांचे गिफ्ट..आणि लेकीने गाजवला धुळे जिल्हा

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे: येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पोटनिवडणुकीतील (Election) लामकानी गटात भाजपच्या (BJP) उमेदवार आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील (MP C. R. Patil) यांची लेक धरती निखिल देवरे (Dharti Nikhil Deore) यांनी जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार २९६ चे मताधिक्क्य मिळवत जिल्हा गाजवला. त्यांच्या विजयाने बोरीससह गटात जल्लोष झाला.

हेही वाचा: आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर आजपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले


लामकानी गटात धरती देवरेंना ८६९० मते मिळाली. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार मीनाबाई देवरे यांना ४३९४ मते मिळाली. यात सौ. देवरे यांना ४२९६ मतांचे मताधिक्क्य मिळाले. तसेच लामकानी पंचायत समिती गणात भाजपचे तुषार रघुनाथ महाले ४०७१ मतांनी विजय झाले. प्रतिस्पर्धी कॉग्रेसचे उमेदवार दिनेश महाले यांना २२८४ मते मिळाली. सौ. देवरे यांनी महाविकास आघाडीचे आव्हान कार्यबळावर मोडीत काढले. आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवारांना ताकद पुरविली होती.


प्रभावी प्रचार यंत्रणा, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क व गटातील प्रत्येक गावातील बूथनिहाय नियोजन यामुळे विजय सोपा झाल्याची प्रतिक्रिया सौ. देवरे यांनी दिली. सासरे भाजपचे नेते सुभाष देवरे, पती उद्योजक निखिल देवरे, दीर व बोरीसचे माजी सरपंच विलास देवरे यांची भक्कम साथ सौ. देवरे यांना लाभत आल्याने त्यांनी विकास कामांचा लामकानी गटात चांगला धडका लावला होता. सौ. देवरे यांना खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुमताई पाटील, कामराज निकम, आरोग्य व शिक्षण सभापती मंगल पाटील, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, किशोर सिंघवी, भाऊसाहेब दिसले आदींनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: शेतकरीपुत्राची भरारी;‘पीएफ’चे भांडवल अन्‌ तीन कंपन्यांचा मालक


सी. आर. पाटलांचे गिफ्टही कामी...
सौ. देवरे या पोटनिवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती होत्या. लेकीच्या प्रचारासाठीही खास विमानाने २७ सप्टेंबरला जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेले खासदार सी. आर. पाटील यांनी बोरीस (ता. धुळे) येथील सभेत जागतिक कन्या दिनाचे निमित्त साधत गावातील लेकींचा सुकन्या योजनेंतर्गत पहिला हप्ता मी भरतो, असे सांगून विशेष गिफ्ट दिले होते. खासदार पाटील यांची ही जादू लामकानी गटात कामी आली आणि लेकीच्या विजयालाही हातभार लागला, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

loading image
go to top