esakal | शेतकरीपुत्राची भरारी;‘पीएफ’चे भांडवल अन्‌ तीन कंपन्यांचा मालक
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरीपुत्राची भरारी;‘पीएफ’चे भांडवल अन्‌ तीन कंपन्यांचा मालक

शेतकरीपुत्राची भरारी;‘पीएफ’चे भांडवल अन्‌ तीन कंपन्यांचा मालक

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : विज्ञान शाखेतून (science) शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुजरातेत (Gujarat) एका कंपनीत काही वर्षांच्या नोकरीतून मिळालेल्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ)चे (PF) भांडवल केले. त्यातून मर्यादित स्वरूपात एक प्रकल्प थाटला अन्‌ जिद्द व मेहनतीची जोड देत त्यावर तीन कंपन्यांपर्यंत (Company) विस्तार वाढविला.

हेही वाचा: आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर आजपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले


मुक्ताईनगर तालुक्यातील दुई या अवघ्या एक हजार ५०० लोकवस्तीच्या गावातील सामान्य शेतकरीपुत्राची ही उद्योग क्षेत्रातील भरारी. डिगंबर फेगडे असे या तरुणाचे नाव. त्यांना मदत केली ती त्यांचा मित्र, भागीदार रवींद्र कोलते यांनी. डिगंबर यांचे वडील गोपाळ फेगडे शेतकरी, आई सावित्री शेतकामात मदत करणारी गृहिणी. डिगंबर यांचे प्राथमिक शिक्षण गावातच दुई येथे जिल्हा परिषद शाळेत, सातवीपर्यंत मुक्ताईनगर आणि सातवी ते बारावीचे शिक्षण खिरोदा (ता. रावेर) येथे झाले. जळगावी मू. जे. महाविद्यालयातून रसायनशास्त्रातून पदवी व फैजपूर महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.


गुजरातेत नोकरी
वडील शेतकरी, तरीही मुलाने उच्च शिक्षण घ्यावे, मोठी नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रारंभी डिगंबर यांनी मुक्ताईनगरात खडसे महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी केली. काहीतरी मोठे करावे म्हणून त्यांचे मन काही मुक्ताईनगरात रमले नाही. त्यांनी गुजरात गाठले व एका केमिकल कंपनीत नोकरी सुरू केली.

हेही वाचा: Jalgaon:अनैतिक संबंधाचा संशय..डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून

उद्योगाची पायाभरणी
या नोकरीच्या अनुभवातून त्यांनी स्वत:च ऑर्गेनिक सॉल्ट हे कृषीसाठी उपयुक्त उत्पादन घेणारा प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला. न्हावी (ता. यावल) येथील त्यांचे मित्र रवींद्र कोलते त्यांच्या मदतीने डिगंबर यांनी कंपनीतील नोकरीतून मिळालेल्या भविष्यनिर्वाह निधीचे भांडवल गुंतवत वलसाडच्या (गुजरात) सारीगाव जीआयडीसीत (गुजरात औद्योगिक विकास मंडळ) आर.डी. इंडस्ट्री म्हणून पहिला प्लांट (२००४) सुरू केला.


प्रतिसाद आणि तिहेरी यश
पहिल्या उद्योगाची पायाभारणी चांगली झाली. उद्योग प्रस्थापित झाला. २०१३ पर्यंत चांगली स्थिती निर्माण झाली, त्यातून फेगडे यांनी ग्रीन टी व्ह्यू म्हणून दुसरी कंपनी सुरू केली. नाशिक, पुणे, मुंबईतून त्यांच्या उत्पादनास चांगली मागणी होऊ लागली. आर.डी. इंडस्ट्रीतून वार्षिक पाच कोटी आणि ग्रीन टी व्ह्यूमधील उलाढालही ३६ कोटींवर पोचली. त्यातून त्यांनी आता ग्रीन क्रॉप नावाने नवा प्लांट सुरू केला आहे. या तिन्ही कंपन्यांमधून त्यांनी प्रत्यक्ष ५० पेक्षा जास्त व अप्रत्यक्षपणे दोनशेवर तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे.

हेही वाचा: अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना दिलासा;जळगावला मिळणार ३५ कोटी

निर्यातीसाठी सज्ज
कृषी उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या त्यांच्या कंपनीतील या उत्पादनाच्या दर्जामुळे त्यास चांगली मागणी असून, आता विदेशातही निर्यात करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने त्यांच्या कंपन्यांची वाटचाल सुरू असून, जळगाव जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील तरुणाचे हे यश उल्लेखनीयच म्हणावे लागेल.

loading image
go to top