esakal | धुळ्यात गणपती विसर्जनासाठी ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात गणपती विसर्जनासाठी ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव

भाविकांनी शंभर टक्के शारीरिक अंतराचे पालन करावे, मास्क लावावेत व प्रशासनाला सहकार्य करावे

धुळ्यात गणपती विसर्जनासाठी ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश विसर्जनासाठी गर्दी होणार नाही यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने शहराच्या विविध भागात त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात अशा ३७ ठिकाणी ही व्यवस्था असून या ठिकाणी नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन करावे, मिरवणूक काढू नये, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पांझरा नदीकाठी मूर्ती विसर्जनास पूर्णतः: प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

सवं नागरिकांनी आपल्या भागातील कृत्रिम तलावातच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जन मिरवणुका काढण्यात येवृ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. भाविकांनी शंभर टक्के शारीरिक अंतराचे पालन करावे, मास्क लावावेत व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था 
-धुळे शहर पोलीस स्टेशन ः संगमा चौक गोळीबार टेकडी रोड, जय मल्हार कॉलनी लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ, संभाप्पा कॉलनी चितोड रोड, शाळा नंबर-२८ चितोड नाका पोलीस चोकी जवळ, दसेरा मैदान, फाशोपुल चौक, संतोषो माता चौक, जे. के. ठाकरे हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, हॉटेल तरंग टी जवळ, शहर पोलीस चौकी. 
-आझाद नगर पोलीस स्टेशन ः पारोळा चौफुली, गिंदोडीया चौक, गोल पोलीस चौकीसमोर, अरिहंत मंगल कार्यालयाच्या अलीकडे टी-पॉइंट, कानुश्री मंगल कार्यालय जुने धुळे, किसनबत्ती वाला खुंट/शाळा नंबर-९ जवळ, जुने अमळनेर स्टॅण्डजवळ. 
-देवपूर पोलीस स्टेशन- जयहिंद सिनियर कॉलेजजवळ, नेहरू चौक, दत्त मंदिर, सावरकर पुतळा, जीटीपी स्टॉप, एसएसव्हीपीएस कॉलेज चौक, डीसी कॉलेजजवळ, संतसेना नगर. 
-पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन- जिल्हा क्रीडा संकुल चौक वाडीभोकर रोड, वलवाडी टी-पॉइंट, वाडीभोकर रोड स्वामी समर्थ पेट्रोल पंपासमोर, नकाणे रोड टी-पॉइंट, राजाराम पाटील नगर फलकाजवळ, मोराणकर बंगला चौक. 
-चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन- अग्रवाल नगर पंचक्रोशी परिसरातील मैदान, सप्तश्रृंगी नगर परिसरातील मोकळे मैदान, श्री. सूर्यमुखी मारुती मंदिराजवळचे मोकळे मैदान, श्री. अग्रसेन महाराज पुतळ्याजवळ गरबा मैदान. 
-मोहाडी पोलीस स्टेशन- अवधान फाटा (एमआयडीसी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर) 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

loading image