esakal | बळीराजा हैराण; तांब्याने पाणी देऊन कपाशी जगवण्यासाठी धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

बळीराजा हैराण; तांब्याने पाणी देऊन कपाशी जगवण्यासाठी धडपड

बळीराजा हैराण; तांब्याने पाणी देऊन कपाशी जगवण्यासाठी धडपड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


शिरपूर : जूनमध्ये नमुन्यादाखल पडलेला पाऊस (Rain) जुलैचा पहिला आठवडा उलटला तरी तोंड दाखवण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे दुबार पेरणीचे (sowing) संकट (crisis) डोक्यावर असल्याने बळीराजा हैराण आहे, तर पुन्हा पेरणीची कोणतीच तजवीज नसलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांवर (Farmer) तांब्या-कळशीने पाणी घालून पिके (crop) जगवण्याची वेळ आली आहे.

(dhule district farme save cotton crop water survive farmer)

हेही वाचा: पावसाअभावी पिके करपू लागली; दुबार पेरणीचे संकट!


तालुक्याच्या सातही महसूल मंडळांत पावसाने ओढ दिली आहे. जूनमध्ये सांगवी व बोराडी परिसराचा अपवाद वगळता अन्यत्र कोरडेठाक वातावरण होते. सांगवी भागात दोन पाऊस बऱ्या‍पैकी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागोलाग पेरण्या केल्या. कपाशीची सर्वाधिक लागवड झाली. सुरवातीला मातीत ओल असल्याने कपाशी अंकुरली. मात्र नंतर पावसाने पाठ फिरवली. जुलैचा पहिला आठवडा उलटूनही अद्याप पावसाचा पत्ता नाही. यात पिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे थोडीफार वाढ झालेली पिके करपण्यास सुरवात झाली आहे. कपाशी वाचवण्यासाठी बादली, हंड्याने दूरवरून पाणी वाहून आणत कपाशीच्या मुळाशी टाकण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. सध्या सांगवी परिसरात जागोजागी हे दृश्य दिसत आहे.

हेही वाचा: नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील ‘माउंट एल्ब्रूस’ सर

गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस
गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यात जूनमध्ये पावसाची सरासरी १३१.४ मिमी असते. यंदा मात्र जूनमध्ये अवघा ४८.४ मिमी पाऊस झाला. जुलैची सरासरी ५० मिमी असते. यंदा जुलैत पाऊस झालेला नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६६० मिमी आहे. या वर्षाचे चित्र लक्षात घेता सरासरीइतका पाऊस होईल की नाही, याची चिंता सर्वांना आहे. पावसाअभावी अनेर व करवंद मध्यम प्रकल्पासह लघुप्रकल्पांच्या जलसाठ्यातही घट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे विहिरींनी तळ गाठल्याने बागायतदारही चिंतेत आहेत.

loading image