esakal | धुळे जिल्ह्यात शाळेची घंटा अखेर वाजली 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule district school open

ग्रामीण भागातील चारशे एकवीस शाळांपैकी तीनशे चव्वेचाळीस शाळा सुरू झाल्यात. सत्ताहत्तर शाळांचा पट तीनशेपेक्षा अधिक आहे. त्यांचा सुरू करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही.

धुळे जिल्ह्यात शाळेची घंटा अखेर वाजली 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात गेल्या साडेआठ महिन्यांपासून बंद असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची घंटा सोमवारी (ता.७) वाजली. विद्यार्थ्यांचा किलबिलाटाने परिसर प्रफुल्लित झाला. जिल्ह्यातील चारशे एकवीसपैकी तीनशे चव्वेचाळीस शाळा विना अडथळा सुरू झाल्यात. चौदा गावातील शाळा प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने बंद तर सत्ताहत्तर शाळांचा पट तीनशेपेक्षा अधिक असल्याने त्याही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चारशे एकवीस शाळांपैकी तीनशे चव्वेचाळीस शाळा सुरू झाल्यात. सत्ताहत्तर शाळांचा पट तीनशेपेक्षा अधिक आहे. त्यांचा सुरू करण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. या माध्यमिक शाळा पंधरा डिसेंबरपर्यंत सुरू होण्याच्या अपेक्षा आहेत. 

धनूरला विद्यार्थ्यांची थर्मल तपासणी 
धनूर येथील शाळेत शिक्षणविस्तार अधिकारी बी.ए. भामरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची थर्मल तपासणी झाली. यावेळी मुख्याध्यापक एस. के. सूर्यवंशी, एम. एस. सैंदाणे, सी. एन. चौधरी, एम. एस. मोरे, आर. जी. महाजन, पी. आर. महाजन, डी. जे. पाटकरी, बी. व्ही. तावडे, ए. जे. सूर्यवंशी, प्रवीण चौधरी, संजय चौधरी, भगीरथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

लामकनीत ४२७ पैकी ९० विद्यार्थ्यांची उपस्थिती 
लामकानी : येथील इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ४२७ पैकी ९० विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक डी व्ही राऊळ, एस. जी. महाले, एस. डी. बाविस्कर , ए.जे. नेरकर, एस. एम. देशमुख, डी. एम. भंडारी , एस. एम. नायदे , के. पी. पाकळे , सी. पी. कंखर , पी. एस. कोळपकर , डी. जे. शेलार , एन. पी. येवले , एन. बी. ठाकूर , प्रा. वाय. डी. वाघ , प्रा. जे. बी. तलवारे आदी उपस्थित होते. 

धुळे तालुक्यात चौदा शाळा प्रतिबंधित क्षेत्रात 
धुळे तालुक्यातील कापडणे, उडाणे, सोनगीर, मोराणे, नेर, नगाव, लोहगड, मोरदड, लोणखेडी, विंचूर, कुसूंबा, फागणे, आर्वी व महिंदळे ही गावे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शाळा 
तालुका----- माध्यमिक शाळा संख्या---- बंद शाळा संख्या 
धुळे ----------------११२-----------------२५ 
साक्री ---------------१२८-----------------१९ 
शिंदखेडा --------------९९-----------------१४ 
शिरपूर-----------------८२-----------------१९ 
एकूण------------------४२१----------------७७ 
एकूण सुरू झालेल्या शाळा संख्या : ३४४ 

संपादन ः राजेश सोनवणे