esakal |  डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive

आज दुपारी बाराला उजेडात आली. त्यामुळे खळबळ उडाली. नंतर पोलिसांच्या मदतीने पळून गेलेल्या मजूराची शोधाशोध सुरू झाली. तो सायंकाळनंतर सापडलेला नव्हता. 

 डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे ः संसर्गजन्य "कोरोना'वरील उपचाराची मदार असलेल्या येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालयातील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात सेवा बजावत असलेल्या 38 वर्षीय डॉक्‍टरला आणि चमठाणे (ता. शिंदखेडा) येथील 30 वर्षीय महिलेला "कोरोना'ची लागण झाल्याचे आज सायंकाळी स्पष्ट झाले. तत्पूर्वी, रूग्णालयातून दुपारी बाराला उत्तर प्रदेशचा कोरोना पॉझिटिव्ह कामगार गरोदर पत्नी, चार वर्षाच्या मुलीसह पळून गेल्याने व्यवस्थापनासह पोलिसांची झोप उडाली आहे. तसेच सायंकाळी उशीरा रूग्णालयातून पुष्पवृष्टी, टाळ्यांच्या कडकडाटात सात कोरोनामुक्त व्यक्तींना घरी सोडण्यात आले. 


दरम्यान, धुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 34 झाली आहे. यात सर्वाधिक धुळे शहरात 25, तर चौघांचा मृत्यू, साक्रीत 4 तर दोघांचा मृत्यू झाला आहे. शिंदखेडा तालुक्‍यात तीन, तर शिरपूर तालुक्‍यातील दोघे मिळून एकूण 34 रूग्ण संख्या झाली आहे. "कोरोना'पाठोपाठ विविध कारणांमुळे हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रूग्णालय बहुचर्चित ठरत आहे. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने पलायन केल्याने चर्चेचा कळसच गाठला गेला. दादर- मुंबई येथून ट्रकने वीसहून अधिक कामगार, मजूर धुळेमार्गे उत्तर प्रदेशकडे जात होते. त्यांच्या ट्रकला सोनगीर (ता. धुळे) शिवारात अपघात झाला. त्यामुळे मजूरांना जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट झाली. त्यात उत्तर प्रदेशचा विवाहीत 22 वर्षीय तरूण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तसा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाला. संबंधित मजूराची गरोदर पत्नी, चार वर्षाच्या मुलीसह रूग्णालयातील कोव्हीड कक्षातून पळून गेल्याची माहिती आज दुपारी बाराला उजेडात आली. त्यामुळे खळबळ उडाली. नंतर पोलिसांच्या मदतीने पळून गेलेल्या मजूराची शोधाशोध सुरू झाली. तो सायंकाळनंतर सापडलेला नव्हता.
 


एक डॉक्‍टर पॉझिटिव्ह 
असे असताना हिरे महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयाला दुसरा धक्का बसला. महाविद्यालयात एका अभ्यासक्रमाच्या व्दीतीय वर्षात शिक्षण घेत असलेला मुंबईस्थित 38 वर्षीय विद्यार्थी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सायकांळी समोर आली. त्यामुळे संपूर्ण स्टॉफ हादरला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच इतर डॉक्‍टरांनाही आता पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच चिमठाणे येथील तरूण महिला कोरोना पॉझिटिव्ह 


सात कोरोनामुक्त घरी 
हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाकडून सायंकाळी दिलासाही देण्यात आला. परवा चार कोरोनामुक्त रूग्णांना घरी सोडण्यात आले होते. यानंतर आज (बुधवारी) चौदा दिवसांनंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने सात रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी पुष्पवृष्टी व टाळ्यांचा कडकडाट झाला. दिवसभरातील अशा घडामोडींमुळे हिरे महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय पुन्हा चर्चेत आले. 

loading image
go to top