esakal | धुळ्यात औषध विक्रेत्यांकडून बंदचा इशारा !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात औषध विक्रेत्यांकडून बंदचा इशारा !

धुळ्यात औषध विक्रेत्यांकडून बंदचा इशारा !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशीधुळे : कोरोना महामारीत (Corona epidemic) औषध विक्रेत्यांनीही (Drug dealers)चोवीस तास सेवा देत आरोग्यव्यवस्थेला सहकार्य केलेले (Healthcare help) आहे. तरीही केंद्र (Central) व राज्य शासनाकडून ( State Governments) व्यावसायिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत (Ignore demands) असल्याने नाराजी व्यक्त करत मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या काळात व्यवसाय बंदचा इशारा (Business closure warning) द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने (Maharashtra State Chemists and Druggists Association) दिला आहे.

(drug dealers Ignore demands Business close warning)

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात म्युकरमायकोसिस उपचारासाठी टास्क फोर्स

संघटनेकडून अध्यक्ष नरेश भगत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्रासह देशभरात कोविडच्या प्रादुर्भावाची पहिली लाट ओसरून दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहोत. कोविडच्या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या यादीत कोविडयोद्धा म्हणून औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. औषध विक्रेता व तेथील कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन चोवीस तास सेवा देत आहेत. त्यामुळे देशभरासह राज्यात औषध पुरवठा सुरळीत राहण्यास मदत झाली. विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध कोविड रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांशी येतो व त्यांना दुष्परिणामास सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. देशभरात सुमारे दोनशेहून अधिक औषध विक्रेते कोविडचे बळी ठरले असून, हजाराहून अधिक परिवारांतील त्यांचे नातेवाईक बाधित झाले आहेत. असे असताना केंद्र व राज्य सरकारने कोविडयोद्धा म्हणून सन्मान तर दूरच साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य दाखविले नाही.

हेही वाचा: अखेर..आरटीओकडून महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तपासणी सुरू

संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनेला संपूर्ण लॉकडाउनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास नाइलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी दिला आहे. याबाबत धुळे जिल्हाधिकारी व धुळे महापालिका आयुक्त तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे. या वेळी धुळे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश भगत, जिल्हा सचिव अमित पवार, जिल्हा सहसचिव अनिल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शांतिलाल पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गिंदोडिया, संघटक सचिव जगदीश महाले, धुळे तालुकाध्यक्ष विजय चौधरी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते. कोशाध्यक्ष रवी धामी, शिरपूर तालुकाध्यक्ष तुषार जैन, साक्री तालुकाध्यक्ष धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.
(drug dealers Ignore demands Business close warning)

loading image
go to top