अखेर..आरटीओकडून महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तपासणी सुरू

बसेस चालकांकडून महसूल बुडवून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत होती
अखेर..आरटीओकडून महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तपासणी सुरू

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Corona infection) अत्यावश्यक असल्यास प्रवासासाठी (Migrants) आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली (RTPCR testing is mandatory) आहे, असे असताना खासगी बसेस मात्र (Private buses) कोणत्याही प्रकारची चाचणी न केलेल्या प्रवाशांसह नियमांचे उल्लंघन करून दररोज शेकडोंच्या संख्येने नवापूर मार्गाने रवाना होत होत्या. यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता होती. याची दखल उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयाने घेत त्याचदिवशी तीन विशेष पथकांची नियुक्ती करत वाहनांची कडक तपासणी सुरू (Strict inspection of vehicles) केली आहे. दरम्यान, आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसताना प्रवाशांना नेणाऱ्या सहा बसेसवर कारवाई केली आहे.
( maharashtra gujarat border rto three special squads strict inspection vehicles)

अखेर..आरटीओकडून महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तपासणी सुरू
पाणी टंचाईच्या वाडी-वस्त्यांसाठी 'स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना'

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यास नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परजिल्हा व परराज्यातील वाहतूक थांबविणे गरजेचे होते. यामुळे प्रशासनाने या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी अत्यावश्यक असल्यास आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर प्रवासास काहीशी सवलत दिली आहे. परिणामी परजिल्हा व परराज्यातील वाहतुकीत घट झाली होती. असे असताना काही खासगी बसेस नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक करत होते. नवापूरमार्गे दररोज शेकडो खासगी बसेस नियमांची पायमल्ली करीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आरटीपीसीआर चाचणी न करताच नेत होते. बसेसमधील प्रवाशांकडून कोणतेही सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने व बसेस चालकांकडून महसूल बुडवून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत होती.

नागरिकांचा पुढाकार
यामुळे आडमार्गाने जाणारे व क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस चालकांवर कारवाई होणार आहे. कोरोना काळात या माध्यमातून शासनास महसूलही मिळणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यातील आमलाण येथील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा बसेस पकडून प्रशासनास कारवाई करण्यास सहकार्य केले. या कृतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले असून अशा प्रकारचे उल्लंघन करीत असल्याचे आढळल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

अखेर..आरटीओकडून महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तपासणी सुरू
जि.प. सदस्य धडकले..आणि पोषण आहार विल्हेवाटीचा डाव फसला !


नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करीत आहोत. आडमार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष आहे. त्यासाठी तीन पथके नियुक्त केले आहेत. परिसरातील ग्रामस्थांनी आडमार्गे जाणाऱ्या वाहनांची माहिती देऊन सहकार्य करावे.
-नानासाहेब बच्छाव, उपप्रादेशिक अधिकारी, नंदुरबार

( maharashtra gujarat border rto three special squads strict inspection vehicles)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com