हमी भाव वाढीवर शेतकरी संघटना म्हणते "तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार'..!

जगन्नाथ पाटील
Tuesday, 2 June 2020

केंद्र सरकारने भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग आदी चौदा पिकांसाठी दीडपट "एमएसपी' देण्याचा निर्णय घेतला. त्यास शेतकरी संघटनेचा जिल्हा शाखेतर्फे कडाडून विरोध आहे. बाजारात धान्याचे भाव गडगडतात. तेव्हा ते धान्य शासन खरेदी करीत नाही.

कापडणे (जि. धुळे) : केंद्र सरकारने चौदा पिकांवर हमी भाव वाढीचा निर्णय जाहीर केला. त्यास शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे "तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार', अशी टीका संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, की केंद्र सरकारने भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग आदी चौदा पिकांसाठी दीडपट "एमएसपी' देण्याचा निर्णय घेतला. त्यास शेतकरी संघटनेचा जिल्हा शाखेतर्फे कडाडून विरोध आहे. बाजारात धान्याचे भाव गडगडतात. तेव्हा ते धान्य शासन खरेदी करीत नाही. नावाला भाव वाढ करायची. अटी आणि शर्ती लागू करायच्या. पणन यंत्रणेकडे सक्षम व्यवस्था नाही. सध्या कापसाची खरेदी सुरू आहे. यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसाठी "एमएसपी' वाढविणे म्हणजे "तोंड दाबून बुक्कीचा मार आहे', असे मत श्री. रघुवंशी यांनी मांडले.
खुल्या बाजारात भाव पडलेले असताना शासन धान्याची खरेदी करीत नाही. सरकारच्या मनात शेतकरी भल्याचा विचार नाही. सध्या कापूस खरेदी सुरू आहे. दररोज शंभर वाहनांना परवानगी असतानाही केवळ 35 वाहनांतील कापसाची खरेदी होत आहे. त्यातही कटती लावली जात आहे. लुबाडणूक सुरू आहे. "एमएसपी' घोषित करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा विचार होत नाही. इतर राज्यात खरेदीची चांगली व्यवस्था आहे. येथे तशी व्यवस्था नाही. तेव्हा दीडपट वाढविलेली "एमएसपी' शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी टीका श्री. रघुवंशी यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule farmer sanghtna aggressive in goverment no hamibhav

Tags
टॉपिकस
Topic Tags: