शेतातून अचानक बिबट्या आला समोर; आणि शेतकरी सैरावैरा पळाले ! 

सुरज खलाणे
Monday, 2 November 2020

काही अंतारावरच शेतकरी बबलू माळी व लक्ष्मीबाई माळी हे दृष्य बघत होते. जीव वाचविण्यासाठी दोघा माय लेकांनी सैरावेरा पळाले आणि आपला जीव वाचविला.

नेर ः  जंगल आधिवासात अन्न पाण्याची कमतरतेमूळे अन्नाच्या शोधात वन्यजीव प्राण्यांचा शेती शिवाराता भ्रमंती व मुक्त संचार वाढलेला आहे. असाच नेर येथील महलकाळी शेतीशिवारात रविवारी दिवसा ढवळ्या बिबट्या शेतकऱयांच्या समोर आला आणि शेतकरी भयभित होवून सैरावैरा पळून आपले कसेतरी प्राण वाचवीले. 

महलकाळी येथील गट क्रमांक 244 या शेतात शेतकरी बबलू यशवंत माळी, त्यांच्या आई लक्ष्मीबाई यशवंत माळी हे दोघे स्वतःच्या शेतात कापूस वेचणी करतांना कापसाने भरलेल्या गोण्या बाहेर काढत होते. यावेळी त्यांना साधारण शंभर ते दीडशे फुटावर असलेल्या मका या पिकातून बिबट्या बाहेर आला आणि शेजारी बाजरी कापणी झालेल्या शेतात जावून उभा राहीला. काही अंतारावरच शेतकरी बबलू माळी व लक्ष्मीबाई माळी हे दृष्य बघत होते. जीव वाचविण्यासाठी दोघा माय लेकांनी सैरावेरा पळाले आणि आपला जीव वाचविला. पळ काढतांना लक्ष्मीबाई या खालती पडल्या त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

 

उंच पूरा बिबट्या भ्रमंती केली

बबलू माळी व त्यांच्या आई कापूस वेचणीच्या गोण्या नेत असतांना त्यांना मकाच्या शेतामधून बिबट्या बाजरी कापणी झालेल्या शेतात बिबट्या उभा  होता. उंच तसेच लांब असलेला बिबट्याने थोडा वेळ मोकळ्या शेतात भ्रमंती करून बाजूला असलेल्या कापसाच्या शेतात निघून गेला असे बबलू माळी यांनी सांगितले.

वनविभागाच्या अधिकाऱयांना शेतकरी भेटले

रविवारी घडलेल्या प्रकारामुळे शेतकरी केशव माळी, विक्रम सैंदाणे,माधवराव  माळी, साहेबराव गवळे, भिला माळी,मधुकर माळी, भगवान माळी, अशोक माळी, संजय माळी, मधुकर खलाणे, भगवान नागो खलाणे, बबलू माळी आदी शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग पदाधिकाऱ्यांना अजर् दिला. तातडीने बिबट्याला अटक करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. 
 

"दिवसा या बिबट्याचा वावर असल्यामुळे सध्या शेतात कापूस वेचणी तसेच मका कापणीची कामे सुरु आहेत.कापूस वेचणीसाठी लहान मुलं असतात. याठिकाणी मजुरांची मोठी संख्या असतें भविष्यात मोठी हानी टळावी म्हणून या बिबट्याचा वनविभाग कर्मचाऱ्यांनी तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे".  

विक्रम सैंदाणे, शेतकरी, नेर. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule farmers in the field saw leopards somehow saving lives