आता खरीप पिकांसाठी शेती मशागतीला सुरुवात !

गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचे वातावरण असून शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे.
farmer
farmerfarmer

त-हाडी : आता रब्बी पिकातील काढणीचे सर्व कामे पूर्ण झाली आहेत.आता शेतकरी ( farming) खरीप पिकाच्या (crop) पेरणीसाठी जमिनीच्या मशागत करण्यात व्यस्त दिसून येत आहे. दर वर्षी या महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराई (wedding) राहत असे त्यामुळे तो लग्नाच्या धावपळीत राहत असे. परंतु मार्च (march) महिन्यापासून कोरोना व्हायरस (coronavirus) विषाणू रोगाचा मोठया प्रमाणात प्रदुर्भाव होत असल्याने देशात सर्वत्र लॉक डाऊन (Lockwood) सह संचारबंदी असल्याने या वर्षी लग्नसह धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थिती लग्नसोहळा आटप्पण्यात येत असल्याने लग्नाचा गाजावाजा नाही. या लॉकडाऊन मुळे शेतातील रब्बी हंगामातील सर्व पिकाची काढणी झाली आहे. जरी रब्बी हंगामातील शेतात पिकविलेल्या पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोड़ले असले तरी बळीराजा (farmer) मोठ्या जोमाने खरीपाच्या तयारीला लागला आहे.

( farming work started farmers)

farmer
रूग्णांअभावी नंदुरबारच्या रेल्वेकोच आयसोलेशनला कुलूप

नैसर्गिक आपत्ति आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणा ऱ्या दरामुळे शेतकरीची आर्थिक परिस्थिति खलावली आहे.पूर्वी जमिनिचि मशागत बैलजोडीने केली जात आसे .त्यामुळे शिवारामघ्ये या महिन्यांमघ्ये बैलाच्या गळ्यातील गोघर-घाटीचा मंजुळ आवाज ऐकाव्यास मिळतं आसे.परन्तु बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामघ्ये शेतीची मशागत ट्रक्टरच्या साहयाने केली जाऊ लागली आहे.त्यामुळे आता त्यामुळे आत्ता बैलांची संख्या कमी झालेली. अगदी मोजक्या शेतकऱ्याकडे बैलजोडी दिसून येत आहे.जरी जरी विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली तरी ठराविक कामे बैलांच्या साह्याने केली जातात. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे ट्रक्टर आहे.त्यामुळे जमिनीची मशागत ट्रक्टर करताना दिसून येत आहेत. चालुवर्षी डिझेलचे भाव वाढल्यामुळे जमीन नागरणीचे दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यत एकरी पंधराशे भाव होता. चालु वर्षी त्यात वाढ होऊन दोनहजार पर्यत गेल्याने सर्वसाम्यान शेतकऱ्यांला हां दर परवडणार नाही .

मालाला भाव मिळत नाही

गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होऊन लागले आहे. त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे.उन्हाळी कांद्याची काढणी होऊन भावा अभावी कांदा चाळीत साठवणूक केली आहे. शेतीची नागरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे शेतीची नागरणी करतांना दिसून येते आहे.नागरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामे करीत आहे. पुन्हा जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने बेले पाडण्याचे कामे सुरू आहेत. चालू वर्षी शेतीत पिकवलेल्या कोणत्याही मालाला भाव नसल्याने आता खरिपात कोणते पीक घ्यावे याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.

farmer
पहाटेच्या थरारात कुटुंब रस्‍त्‍यावर; एकट्या महिलेचे धाडस

बेमौसमी पावसाचा फटका..

दोन-तीन वर्षापासून बेमौसमी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हाती पिके न आल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे . शेतीमाल भाव नाही.कांद्याला भाव नाही .त्यामुळे शेतकऱयाने पुढे भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत सावणूक करून ठेवली आहे.शेकरयाने लागवड केलेला भाजीपाल्याला भाव नाही.कांदा विकून आलेल्या अल्पशा पैशातून बी-बियाणे ,खते मजुरी आदीचे नियोजन होते होणार नाही म्हणून कोणाकड़े उसनवार पैसे मिळतील व् त्यातून बियाणे खरेदी करता येई ल म्हणून शेतकरी फिरताना दिसत आहे सरकार जरी खरीप हगामात खत टंचाई होउ देणार नाही याची ग्वाही देत आसली ऐन मोसमात खत टंचाई जाणवते हा आनुभव प्रत्येक वर्षाला आहे .त्यामुळे रासयनिक खताचा काळा बाजार होऊन चढत्या विकली जातत. आता जरी खंताच्या किमती जरी स्थिर आसल्या तरी खरीपाची पिके एन मोसमात आसताना यूरिया खताची टंचाई दर वर्षी जाणवते याचा आनुभव शेतकरयाला आहे.बियाणाची किमती दर वर्षी वाढत आसतात .शासन स्तरावरुन जी बियाणे देण्यात येते ती ठराविक कंपनीचे आसतात.त्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही .त्यामुळे शेतकरी दर्जेदार कंपनीचे महगडी बियाणे खरेदी करतात .

( farming work started farmers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com