esakal | पहाटेच्या थरारात कुटुंब रस्‍त्‍यावर; एकट्या महिलेचे धाडस
sakal

बोलून बातमी शोधा

house fire

पहाटेच्या थरारात कुटुंब रस्‍त्‍यावर; एकट्या महिलेचे धाडस

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा (जळगाव) : विचखेडे (ता. पारोळा) येथील दलित वस्तीतील रहिवाशी सुपडू एकनाथ सुर्यवंशी यांच्या घराला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने घरातील पशुधनासह संसारोपयोगी वस्तू जळुन खाक झाले. यात तब्बल ५ लाखापर्यतचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत गरीब सुर्यवंशी कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी समाजसेवक पंकज बावीस्कर यांनी केली.

हेही वाचा: दहावीच्‍या परीक्षा रद्द पण अकरावी प्रवेशाच्या सीईटीचे काय?

विचखेडे येथील रहिवाशी सुपडू सुर्यवंशी हे पारोळा येथील जिनिंगमध्ये वॉचमन म्हणून कामाला आहेत. आई श्यामाबाई, पत्नी सुरेखा व दोन मुले आकाश व संदीप असे त्यांचे कुटुंब आहे. यात आई व मुलगा आकाश हे दोन जण बाहेरगांवी गेले होते. तर सुपडु सुर्यवंशी हे जिनिंग येथे कामाला होते. घरात सुरेखा सुर्यवंशी व मुलगा संदीप हे दोन जण होती.

जीव वाचविण्याची धावपळ

पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अचानक घराला आग लागल्याचे लक्षात येताच सुरेखा सुर्यवंशी यांनी मुलगा व स्वत: च्या जीव वाचविणेसाठी धावपळ केली. घरातील पशुधनास बाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला. परंतु आगीने मोठ्या प्रमाणात रुद्रावतार धारण केल्याने घरातील ४ बकऱ्या, २ बोकड, ५ कोंबडी, गहु, तांदुळ व बाजरीसह २७० किलो धान्य यासह संसारोपयोगी भांडे, टिव्ही, सायकल असे सर्व साहित्य जळुन खाक झाले. घराच्या फक्त भिंती उभ्या राहिल्‍या असून गरीब कुटुंब रस्त्यावर आले आहे.

हेही वाचा: विद्यापीठाचे दातृत्व..अंत्यविधीसाठी दिली दोनशे टन लाकूड

मुलाला वाचविले पण पशुधन नाही वाचविता आले

सुरेखा सुर्यवंशी यांच्या धाडसाने जिवीत हानी टळली. मात्र पशुधन गेल्याचे दुःख, गरीब कुटुंब रस्त्यावर आले. दलित वस्तीतील गरीब सुर्यवंशी कुटुंबात अकस्मात आग लागली. आगीच्या धुर लक्षात येताच सुरेखा सुर्यवंशी यांनी परिसरातील लोकांना बोलाविण्याचा प्रयत्न करत धाडस दाखवित मुलगा संदीप यास बाहेर काढले. मात्र आग मोठी भयंकर असल्याने घरातील बांधलेले पशुधन व धान्य तसेच संसारोपयोगी वस्तु बेचिराख झाले.

गावातून मदतीसाठी धीर

सदरची घटना कळताच समाजसेवक पंकज बाविस्कर, सरपंच मनिषा पानपाटील, उपसरपंच गणपत गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पानपाटील, राजेंद्र चौधरी, गौतम सूर्यवंशी यांचेसह ग्रामस्थ यांनी सुपडु सुर्यवंशी परिवारास धीर देत आपल्या परिने आर्थिक मदत केली. यावेळी पंकज बावीस्कर यांनी घटनेची माहिती तहसीलदार अनिल गवांदे यांना सांगितली.

पोटाची खडगीला आगीचा चटका

रात्रंदिवस मेहनत करुन घराचा उदरनिर्वाह करित होता. कोरोनामुळे कोणतेही काम नसल्याने एका खाजगी जिनिंगला वॉचमन म्हणुन काम करतो. अचानकपणे संकटाने आघात केला. आगीमुळे सर्व घरातील वस्तुंची राख झाली. सुदैवाने जीव वाचला; मात्र पोटाच्या पोरासारखी पशुधन आगीत होरपळली गेली. अचानकपणे पोटाच्या खळगीला आगीचा चटका लागेल असे मनात देखील नव्हते. आगीमुळे आम्ही रस्त्यावर आलो. याबाबत शासनाने योग्य ती दखल घेवुन मदत करावी.

- सुपडु सुर्यवंशी, विचखेडे