esakal | तिचा निर्णय धाडसी..वडिलांच्‍या निधनानंतर केले मुंडण 
sakal

बोलून बातमी शोधा

father death and doughter sheving

देवपूरमधील भोई सोसायटीत शिक्षक लक्ष्मण वाडिले यांचे कुटुंबासह वास्तव्य होते. त्यांची कन्या प्रा. बबिता वाडिले विवाहानंतर सासरी येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागे वास्तव्यास गेल्या.

तिचा निर्णय धाडसी..वडिलांच्‍या निधनानंतर केले मुंडण 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रथा-परंपरेने पुरुष वर्ग मुंडण करतो. मात्र, येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील प्राध्यापिका दुर्गेने वडिलांच्या निधनानंतर मुंडण करत प्रथा-परंपरेला मूठमाती दिली. त्यांच्या आदर्शवत भूमिकेचे स्वागत करत, समाजासाठी प्रेरणादायी पावले उचलल्याने त्या प्राध्यापिकेचा मराठा सेवा संघप्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेसह विद्यार्थ्यांनी सत्कारातून पाठबळ देत हुरूप वाढविला. 
 
देवपूरमधील भोई सोसायटीत शिक्षक लक्ष्मण वाडिले यांचे कुटुंबासह वास्तव्य होते. त्यांची कन्या प्रा. बबिता वाडिले विवाहानंतर सासरी येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागे वास्तव्यास गेल्या. त्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. 

अग्‍निडाग दिल्‍यानंतर मुंडणाचा आग्रह
वडिलांचे हृदयविकाराने निधन झाल्याने वाडिले कुटुंबावर संकट कोसळले. मात्र, धीराने स्थिती हाताळत दुःखी प्रा. बबिता यांनीच वडिलांना अग्निडाग दिला. त्या वेळी त्यांनी केस अर्पण करण्याचा म्हणजेच मुंडणाचा आग्रह धरला; परंतु महिला असल्याने तेव्हा त्यांना मुंडण करणे शक्य झाले नाही. ही अस्वस्थता त्यांच्यात कायम होती. 
प्रा. बबिता वाडिले यांनी ही अस्वस्थता मराठा सेवा संघप्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा समुपदेशक विद्यावर्धिनी महाविद्यालयातीलच प्रा. वैशाली पाटील यांच्याकडे मांडली. प्रबोधन परिषदेतर्फे कौटुंबिक, सामाजिक प्रश्‍नांबाबत समुदेशन (कौन्सलिंग), भ्रूणहत्या, अंधश्रद्धेवरही जनजागृती केली जाते. या अनुषंगाने प्रा. वैशाली पाटील यांनी धीर दिल्यानंतर प्रा. बबिता वाडिले यांनी नुकतेच वडिलांच्या वर्षश्राद्धाला मुंडण करत भावनांना वाट करून देत, प्रथा-परंपरेला मूठमाती देत प्रेरणादायी पाऊल उचलले. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील, जिल्हा सचिव दीपाली पाटील आदींनी सत्कार केला. यातून प्रा. बबिता वाडिले यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिल्याचे परिषदेने सांगितले.