मासे खाणाऱ्यांची मज्‍जाच; भाव उतरले

जगन्नाथ पाटील
Monday, 5 October 2020

जिल्ह्यातील मासेमारीच्या बाजारात आयात मासे अधिक प्रमाणात येतात. त्यांना समुद्री मासे म्हणून मोठी मागणी असते.

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नदी, नाले, तलाव, बंधारे, धरणे आणि प्रकल्प ओसांडून वाहत आहेत. त्यामुळे माश्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात स्थानिकच मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मासेमारी करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. खवय्यांनाही मोठी पर्वणी ठरत आहे. 

मासे विक्रेत्यांची वाढती संख्या 
माश्यांच्या उपलब्धतेमुळे मासेमारी अधिक प्रमाणात होत आहे. विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. गल्लीबोळात भाजीपाल्याच्या विक्रेत्यांप्रमाणे माश्यांची विक्री होत आहे. प्रत्येक गावांत आठ- दहा तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

केवळ प्रतिकिलो १२० 
जिल्ह्यातील मासेमारीच्या बाजारात आयात मासे अधिक प्रमाणात येतात. त्यांना समुद्री मासे म्हणून मोठी मागणी असते. सध्या या माश्याचे भाव प्रतिकिलो १८० ते पासून २४० रुपयांपर्यंत आहेत. स्थानिक मासे अधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने समुद्री माश्यांची मागणी घटली आहे. तरीही दर चढेच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक मासे केवळ प्रतिकिलो १२० ते १४० प्रमाणे विक्री होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule fish prices dropped market