बेवारस नाही सोडले...तृतीयपंथीयांनी केला कोरोनाबाधितावर अंत्‍यसंस्‍कार

Funeral on dead corona positive
Funeral on dead corona positive

धुळे : कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला आपलेच जवळचे म्हणवणारे देखील पाठ फिरवत असल्याची अनेक उदाहरणे गेल्‍या काही दिवसात ऐकण्यास व पाहण्यास मिळाली. मात्र अशा काळात माणुसकी दाखवत जे कोणी लागत नाही; असे लोक देखील बिनधास्‍तपणे मृतदेह उचलून अंत्‍यसंस्‍कार करत आहेत. पण धुळ्यात तृतीय पंथीयांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत कोरोनाबद्दलची भीती दूर केली आहे. शिवाय शेवटच्या क्षणी तरी दूर करू नका असा संदेश दिला आहे.

अन्‌ ते आले पुढे
जुने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचरादरम्‍यान मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधीसाठी तृतीयपंथीय समाजाचे महामंडलेश्वर रवी नाथजोगी तसेच यलम्मा रेणुका देवी मंदिराच्या जोगतींनी स्वतः पुढाकार घेऊन कोरोनाची भीती न बाळगता बाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न घाबरता अंतिम संस्कार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी तृतीयपंथियांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकर, महानगर पालिका कर्मचारी भरत येवलेकर, महेंद्र साळवे, रुग्णवाहिकेचे चालक अबू अन्सारी देखील उपस्थित होते.

अन्यथा बेवारससारखे अंत्‍यसंस्‍कार
कोरोना बाधिताचा मृत्‍यू झाल्‍यास नातेवाईक जवळ येण्यास तयार नसतात. सांगून देखील मृतदेह नुसता उचलण्यास नकार दिला जातो. यामुळे रूग्‍णालयातील कर्मचारीच पीपीई किट परिधान करून अंत्‍यसंस्‍कार करत असतात. मात्र हे अंत्‍यसंस्‍कार करताना अगदी बेवारस मृतदेहाप्रमाणे कोणताही विधी न करता पेटत्‍या लोकडांवर देह फेकला जात असतो. असेच अंत्‍यसंस्‍कार या कोरोना बाधित मृतदेहावर झाले असते. मात्र तृतीयपंथीयांनी पुढाकार घेवून विधीवतप्रमाणे अंत्‍यसंस्‍कार करून घेतले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com