esakal | Video : ट्रॅव्हल्स- गॅस टॅंकरशी धडक; पाच जणांचा मृत्यू?
sakal

बोलून बातमी शोधा

accident

खासगी ट्रॅव्हल्स खाक झाली. आगीच्या लोळात दोन्ही वाहने असल्याने जवळपास कुणीही जाऊ शकणार नाही, अशी स्थिती होती. अजंगपासून (ता. धुळे) दोन किलोमीटरवरील जळगाव रोडवरील काटसर गाव शिवारात हा भीषण अपघात झाला.

Video : ट्रॅव्हल्स- गॅस टॅंकरशी धडक; पाच जणांचा मृत्यू?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'चा विळखा सुटत नसल्याने प्रशासन चिंतेत असताना धुळ्यासह खानदेशला हादरवणारी अपघाताची घटना आज सायंकाळी सव्वापाचनंतर घडली. गॅसचा टॅंकर आणि खासगी टॅव्हल्समध्ये समोरासमोर झालेल्या धडकेनंतर टॅंकरचा स्फोट झाला. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स खाक झाली. आगीच्या लोळात दोन्ही वाहने असल्याने जवळपास कुणीही जाऊ शकणार नाही, अशी स्थिती होती. अजंगपासून (ता. धुळे) दोन किलोमीटरवरील जळगाव रोडवरील काटसर गाव शिवारात हा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर गाव शिवार हादरले. स्फोटाच्या आवाजाने ग्रामस्थ भयभीत झाले. त्यामुळे कुणीही अपघात क्षेत्रात जाण्यास धजवले नाहीत. आगीच्या लोळात दोन्ही वाहने लपेटलेली होती. या अपघातात चार ते पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका पोलिसांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांचा ताफा अपघातस्थळाकडे रवाना झाला आहे. संबंधित खासगी ट्रव्हल्स गुजरातकडून आल्याची प्राथमिक माहितीही देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतरच अधिक तपशील कळू शकेल. या घटनेने अजंगसह पंचक्रोशी सुन्न झाली. खासगी ट्रॅव्हल्समध्ये किती व्यक्ती होत्या किंवा नेमकी काय स्थिती होती, टॅंकरमध्ये किती व्यक्ती होत्या यासंबंधी प्रश्‍नांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नव्हता.