esakal | जबाबदारीची टाळाटाळ...हिरे शासकीय महाविद्यालय हतबल; मनपाकडे कर्मचाऱ्यांसाठी पसरले हात
sakal

बोलून बातमी शोधा

dhule hire medical collage

लॉकडाउन व त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने खासगी क्षेत्रातील अनेक जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. काहींना कमी वेतनात काम करावे लागत आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित असल्याने त्यांना फारसे चिंतेचे कारण नाही, असे चित्र आहे.

जबाबदारीची टाळाटाळ...हिरे शासकीय महाविद्यालय हतबल; मनपाकडे कर्मचाऱ्यांसाठी पसरले हात

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर जगभरात पसरला आहे. त्यातच पाच महिन्यांपासून सरकारी रुग्णालयांमध्ये अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला जात आहे. मात्र, या आड लपून काही चतुर्थ व अन्य काही श्रेणीतील कर्मचारी जबाबदारी टाळत आहेत. या स्थितीबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसह राजकीय, सामाजिक स्तरावरून तक्रारी होत आहेत. या स्थितीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने महापालिकेकडे चतुर्थ श्रेणीतील होतकरू ५० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. 

लॉकडाउन व त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने खासगी क्षेत्रातील अनेक जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. काहींना कमी वेतनात काम करावे लागत आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित असल्याने त्यांना फारसे चिंतेचे कारण नाही, असे चित्र आहे. असे असताना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात चतुर्थश्रेणी व अन्य काही श्रेणीतील कर्मचारी जबाबदारीत चालढकल, टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे राजकीय व सामाजिक स्तरावरून या स्थितीकडे लक्ष वेधले जात आहे. संकटकाळातही काही कर्मचारी अरेरावी करत असल्याच्या तक्रारी आहेत. 
 
सेवेत ८३ कर्मचारी 
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयात चतुर्थ श्रेणीतील सरासरी ६६ कर्मचारी कायम आहेत, तर १७ कंत्राटी आहेत. त्यांच्यात कामाची दोन प्रकारे विभागणी आहे. काही कर्मचारी बाथरूम, प्रसाधनगृह स्वच्छ करतात, तर उर्वरित कक्षसेवक म्हणून फरशी पुसणे, झाडलोट आदी कामे करतात. याशिवाय कक्षात रुग्णाला काही अडचणी आल्यास देखरेख, मदतीसाठी काही सेवक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती असते. दिमतीला डॉक्टर, परिचारिकाही असतात. 

जबाबदारी टाळण्याचा कल 
काही कर्मचारी दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडतात, काही संघटनांसह विविध कारणांआड लपून जबाबदारी टाळतात, अशी तक्रार विविध पातळ्यांवरून होते. कामचुकार कर्मचारी कुणाचेही ऐकत नाहीत, अशी खुद्द हिरे महाविद्यालयाची तक्रार आहे. त्यांना कंटाळून आणि हतबल महाविद्यालय व्यवस्थापनाने महापालिकेकडे चतुर्थ श्रेणीतील होतकरू ५० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. त्यापैकी दहा ते बारा कर्मचारी लवकरच हिरे महाविद्यालयात रुजू हो आहेत. 

संताप होणार नाही तर काय..? 
जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रविवारी पाच ऑक्सिजन सिलिंडरला फ्लोमीटर नव्हते. मात्र, ही गोष्ट कुठल्याही संबंधित कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना सांगावीशी वाटली नाही. पाच रुग्णांना ऑक्सिजनची गरज निर्माण झाली, तेव्हा तातडीने खासगी रुग्णालयातून पाच फ्लोमीटर मागविण्यात आले आणि रुग्णांना सुविधा दिली गेली. तसेच शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होणाऱ्या किंवा असलेल्या रुग्णाला पायी नव्हे, तर व्हीलचेअरवरून अपेक्षित कक्षात नेणे आवश्‍यक आहे. मात्र, वॉर्डबॉय किंवा जबाबदार कर्मचारी जागेवर नसल्याने रुग्णांचे हाल होऊन नाहक महाविद्यालयाविषयी तक्रारी होतात. मग संताप होणार नाही तर काय?, अशी खंत एका डॉक्टरने व्यक्त केली.

संपादन : राजेश सोनवणे

loading image
go to top