esakal | सुखी संसाराचे स्वप्न दोघांनी रंगवले; रस्त्याच्या कडेला उभे राहिले अन मनाला चटका लावून गेला ! 
sakal

बोलून बातमी शोधा

सुखी संसाराचे स्वप्न दोघांनी रंगवले; रस्त्याच्या कडेला उभे राहिले अन मनाला चटका लावून गेला ! 

समाधानी जीवन जगण्याच्या उद्देशाने आपली वाटचाल करणाऱ्या बोरसे परिवारातील कर्तबगार, युवा सदस्याची अखेर सबंध परिवाराला घरघर लावून जाणारी ठरणार आहे.

सुखी संसाराचे स्वप्न दोघांनी रंगवले; रस्त्याच्या कडेला उभे राहिले अन मनाला चटका लावून गेला ! 

sakal_logo
By
जगदीश शिंदे

साक्री : पिंपळनेर- साक्री राज्यमार्गावर मालपुर फाट्यालगत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभे असतांना सिमेंट घेऊन जाणारा मालट्रक ओरटेक करण्याच्या नादात झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अवघ्या दीड-दोन महिन्यापूर्वी सुखी संसाराचे स्वप्न रंगवत बोहल्यावर चढलेल्या या दाम्पत्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास अशारीतीने खंडित व्हावा ही बाब नातेवाईकांसह गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरलेली आहे. 


अतिशय कष्टातून संसाराचा गाडा ओढणारा ज्ञानेश्वर दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा सांभाळ समाधानाने करीत होता. कुटुंबातील सर्व सदस्यांचीही प्रामाणिक साथ एकमेकांच्या कष्टाला लाभत होती. यातूनच समाधानी जीवन जगण्याच्या उद्देशाने आपली वाटचाल करणाऱ्या बोरसे परिवारातील कर्तबगार, युवा सदस्याची अखेर सबंध परिवाराला घरघर लावून जाणारी ठरणार आहे.याबाबत ग्रामीण रूग्णालयात उपस्थित ाांंकडून बोलले जात होते. 

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास साक्रीकडून पिंपळनेरकडे मोटर सायकल क्रमांक एम एच 18 ए. व्ही. 9059 हि रस्त्याच्या कडेला उभी करून बाजूला उभे असलेला ज्ञानेश्वर रावसाहेब बोरसे वय 28 राहणार धाडणे तालुका साक्री आणि राणी ज्ञानेश्वर बोरसे वय 19 राहणार धाडणे यांना पिंपळनेर कडून सिमेंटच्या गोण्या भरून येत असलेला मालवाहू ट्रक क्रमांक एम एच 18 बी.जी. 4755 याने धडक दिली.यात ज्ञानेश्वर बोरसे हे ठार झाले असून राणी बोरसे या जखमी झाल्या आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार करून धुळे येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची घटना कळताच साक्री पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला खाजगी वाहनाने उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.ग्रामीण रुग्णालयात डॉ.बी.पी. गोयल यांनी ज्ञानेश्वर बोरसे यांना तपासून मयत घोषित केले.तर राणी बोरसे हिच्यावर उपचार केले. 

मालपुर फाटयाजवळ अपघात घडल्याची माहिती धाडणे गावात पसरताच नातेवाईकांनी धाव घेतली. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला असुन सहचालकास ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात बघ्यांची गर्दी जमली होती. 


वाढत्या अपघातांमुळे तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात सातत्याने होत असून यात अनेकांना अपंगत्व तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. याबाबत आजच्या अपघात घटनेत मात्र उपस्थितांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top