जलजीवन मिशन: खानदेशातील हजारावर गावांना मिळणार पाणी

ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. यात २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ हा मानस ठेवला आहे.
जलजीवन मिशन: खानदेशातील हजारावर गावांना मिळणार पाणी

धुळे : जलजीवन मिशनअंतर्गत (Jaljivan Mission) धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यांतील एक हजार १४७ गावांसाठी (Village) तब्बल दोन हजार ८०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागांतर्गत (Department of Water Supply and Sanitation) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (Maharashtra Jeevan Pradhikaran) खानदेश भागासाठीचे नवीन कार्यालय सोमवार (ता. १९)पासून जळगाव येथे कार्यान्वित झाले आहे.

(jaljivan mission under the scheme khandesh one thousand villages supply water)

जलजीवन मिशन: खानदेशातील हजारावर गावांना मिळणार पाणी
जळगावकरांनो सावधान..३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस

पूर्वी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीला पाणीपुरवठा योजना निवड, मंजुरीचे अधिकार होते. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनकडे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी या योजनेचे सहअध्यक्ष आहेत. विविध विभागांचे खातेप्रमुख सदस्य, तर खासदार, आमदार मानद सदस्य आहेत. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव आहेत.


२०२४ पर्यंत प्रभावी अंमल
ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. यात २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ हा मानस ठेवला आहे. योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के वाटा आणि दहा टक्के लोकवर्गणी, अशी निधीची उपलब्धता असेल. योजना पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालविल्यास आणि देखभाल दुरुस्ती योग्यरीतीने केल्यास ग्रामपंचायतीला योजनेच्या एकूण खर्चाच्या दहा टक्के रक्कम प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्याची तरतूद आहे.

जलजीवन मिशन: खानदेशातील हजारावर गावांना मिळणार पाणी
उपमहापौरांवर नक्की गोळीबार झाला का? कुठल्याही खाणाखुणा नाही


पाणीपुरवठ्याचा निकष
यापूर्वी अनेक पाणीपुरवठा योजना अमलात आल्या. मात्र, चुका दुरुस्त करून जलजीवन मिशन अस्तित्वात आले आहे. पूर्वीच्या योजना प्रतिमाणसी प्रतिदिन दरडोई ४० लिटर पाण्याच्या निकषावर आखल्या, तर जलजीवन मिशन प्रतिमाणसी प्रतिदिन ५५ लिटर दरडोई प्रमाणावर आखले आहे. यात मिशनला यशस्वी करताना सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्याचा आदेश आहे. मिशनअंतर्गत २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनाही आता ५५ लिटर प्रतिमाणसी प्रतिदिन योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत धुळे तालुक्यातील तब्बल ८९ गावांच्या समावेशाला मंजुरी मिळाली आहे.

धुळे तालुक्यातील या गावांचा समावेश
धुळे तालुक्यातील अजंग, खेडे, शिरूड, कासविहीर, कुंडाणे (वेल्हाणे), सीताणे, आर्णी, कुंडाणे, सोनेवाडी, बाबरे, कुंडाणे (वार), सोनगीर, बेहेड, दिवाणमळा, तांडा कुंडाणे, भिरडाई, लळिंग, उभंड, भिरडाणे, लामकानी, उडाणे, बोरीस, लोहगड, वणी बु., बोरकुंड, लोणखेडी, वेल्हाणे, बोरसुले, मळाणे, विंचूर, बोरविहीर, मोहाडी प्र., सुकवड, बुरझड, मोरदड तांडा, विश्‍वनाथ, हिंगणे, मोरशेवडी, वार, चिंचवार, मुकटी, दापुरा, धंडाने, दापुरी, नगाव बु., देवभाने, तिसगाव, देऊर बीके, नंदाणे, देऊर खु., नवलाने, धाडरी, नावरी, धमाणे, महाल काळी, धोडी, महाल कांदामना, धनूर, महाल कसाद, लोणकुटे, महाल लोंडा, फागणे, महाल पांढरी, गोताणे, महाल रेवत, हडसुणे, महाल माळी, हेंद्रुण, नूरनगर- नेर, तामसवाडी, निकुंभे, होरपडा, निमखेडी, विसरणे, न्याहळोद, जापी, पिंपरखेडे, जुनवणे, रानमळा, जुन्नेर, रतनपुरा, काळखेडे, सातरणे, कापडणे, सौंदाणे, कौठळ, सायने, खंडलाय खु., शिरधाने प्र. डांगरी आदी गावांचा मिशनमध्ये अंतर्भाव आहे.

जलजीवन मिशन: खानदेशातील हजारावर गावांना मिळणार पाणी
महसूलचा अफलातून प्रताप..कर्जच घेतले नाही तरी उताऱ्यावर नोंद

जलजीवन मिशनचे वैशिष्ट्ये :
प्रत्येक कुटुंबाला घरी नळाने पाणी
प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणीपुरवठा
शुद्ध, स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प
सार्वजनिक नळाद्वारेही कुटुंबांना पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com