अरे बापरे झन्ना- मन्नाचा डाव उधळला; तब्‍बल तेरा मोटारसायकल ताब्‍यात

भरत बागूल
Sunday, 25 October 2020

पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील मापलगाव शिवारात आमसर डोंगराच्या पायथ्याशी काही इसम पैसे लाऊन ५२ पत्याचे कॅटवर झन्ना- मन्ना नावाचा पत्यांचा जुगाराधा खेळ खेळत व खेळवित आहेत;

पिंपळनेर (धुळे) : पोलिस स्टेशन हद्दीतील मापलगाव शिवारात आमसर डोंगराच्या पायथ्याशी झन्ना- मन्ना नावाचा पत्यांचा जुगाराधा खेळ खेळत असतांना पिंपळनेर पोलिसांनी छापा टाकला. यात पाच लाख वीस हजार रुपये किंमती मुद्देमाल जप्त केला असून पिंपळनेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील मापलगाव शिवारात आमसर डोंगराच्या पायथ्याशी काही इसम पैसे लाऊन ५२ पत्याचे कॅटवर झन्ना- मन्ना नावाचा पत्यांचा जुगाराधा खेळ खेळत व खेळवित आहेत; अशा स्वरुपाची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी भरत पवार (वय ५५ रा. डांग, सा. आहवा, जिल्हा डांग राज्य गुजरात), आनंद गायकवाड (वय २८ वर्ष, रा. जरी, पो. गारखडी ता. सुबीर, जि. डांग, गुजरात), गोपाळ चौधरी (वय ४२ वर्ष, रा. जामण्या, पो. गारखडी, ता. सुवीर, जि. डांग गुजरात), प्रविण देसाई (वय 19१९ वर्ष, रा. बिगुनपाडा, ता. सुधीर, जिल्हा डांग, गुजरात), लालमन बर्डे (वय २८ वर्ष, रा. चिंचली, ता. आहवा, जिल्हा डांग गुजरात) हे मिळुन आले. तर काही इसम पळुन गेले. 

असा आढळला मद्देमाल
पकडलेल्या इसमांचे पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात ११ हजार ५०० रोख रक्कम, ११ हजार रूपयांचे तीन मोबाईल, १३ मोटारसायकल व जुगाराची ५२ पत्याच्या दोन कॅट शंभर रूपये किंमतीची असे एकूण पाच लाख वीस हजार रुपये किंमती जप्त केले असून पिंपळनेर पोलीस स्टेशन भाग 6 गुन्हा रजि नं 65/2020 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोहेका मनोज शिरसाठ, पोकों विशाल मोहने, पोको प्रविण सोनवण, पोका ग्यानसिंग पावरा हे सहभागी होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule jugar police action five lakh cash seased