esakal | शेकडो वर्षांच्या भगतच्या काठीला यंदा आडकाठी 
sakal

बोलून बातमी शोधा

navratri utsav

नवमीला मढींमधून घट विसर्जनाची मिरवणूक काढली जात असते. यावेळी एकवीस ते एक्केचाळीस फुट काठीची मिरवणूक काढली जाते. या काठीला भगतची काठी म्हटले जाते.

शेकडो वर्षांच्या भगतच्या काठीला यंदा आडकाठी 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : खानदेशातील प्रत्येक गावात समाजनिहाय देवस्थानची मढी आजही अबादीत आहे. या मढींमध्ये नवरात्रोत्सवात घट बसवून भजन जागरण केले जात असते. नवमीला मढींमधून घट विसर्जनाची मिरवणूक काढली जात असते. यावेळी एकवीस ते एक्केचाळीस फुट काठीची मिरवणूक काढली जाते. या काठीला भगतची काठी म्हटले जाते. या भगतच्या काठीला कोरोना लाॅकडाउनचा फटका बसणार आहे. मिरवणूक बंदी असल्याने शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भगतच्या काठीला कोरोनाच्या आडकाठीचा फटका बसणार आहे.

मिरवणूकांना पंचवीसपर्यंत प्रतिबंध
धुळे जिल्ह्यात आगामी काळातील सण उत्सव व विविध आंदोलनांची शक्यता आणि कोरोनाचा फैलाव लक्षात घेवून पंचवीस आॅक्टोबरपर्यंत प्रतिबंधाात्मक आदेश लागू झाले आहेत. यामुळे नवरात्रीतील विविध धार्मिक कार्यक्रम अडचणीत आले आहे. भगत काठी मिरवणूकीला अडचण निर्माण झाली आहे.

सामूहिक घट ऐवजी व्यक्तीगत गट विसर्जन
नवरात्रीत घटस्थापनंतर नवमीला घटांचे विसर्जन केले जात असते. मढी प्रमुख भगत यांची काठी मिरवणूक काढली जाते. यात संबंधित मढीचा समाज मिरवणूकीत सहभागी होत असतो. प्रतिबंधात्मक आदेशामुळे घट मिरवणूकीला फटका बसणार आहे. मात्र पाचच्या गटाने सुरक्षित अंतर ठेवत घट विसर्जनाला अडसर नसल्याचे एका भगतने सांगितले. दरम्यान नवरात्री उत्सवावरही कोरोमाचे सावट आहे. भगत मंडळी व देवींचे भक्त देवीला कोरोनाचे संकट टाळण्यासाठी साकळे घालणार आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image