esakal | वेशांतर करत पोहचले मद्य कारखान्यात; तीन लाखाचे साहित्‍य जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

dublicate wine company

शेवाळी- दादर्ती शिवारातील शेतीलगत खोलीत मंगेश बाविस्कर बेकायदेशीर बनावट मद्य कारखाना चालवित असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यावरून एलसीबी पथकाने कारखान्यावर छापा टाकला.

वेशांतर करत पोहचले मद्य कारखान्यात; तीन लाखाचे साहित्‍य जप्त

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : वेशांतर करत आणि कल्पकता, तंत्रज्ञानाच्या वापरातून एलसीबीच्या पथकाने शेवाळी- दादर्ती (ता. साक्री) येथील बनावट मद्याचा कारखाना उद्‌ध्वस्त केला. यात विविध पावणेतीन लाखांचे साहित्य जप्त करून पोलिसांनी धुळे शहरातील तीन संशयितांना अटक केली. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
शेवाळी- दादर्ती शिवारातील शेतीलगत खोलीत मंगेश बाविस्कर बेकायदेशीर बनावट मद्य कारखाना चालवित असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यावरून एलसीबी पथकाने कारखान्यावर छापा टाकला. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचारी वेशांतर करून घटनास्थळी पोचले. त्या वेळी वादग्रस्त खोलीत काही संशयित बनावट मद्य तयार करताना आढळले. त्यामुळे पथकाने मंगेश बाविस्कर (वय ३१, रा. सिंचन भवन, साक्री रोड, धुळे), नितीन पाटोळे (३४, रा. रामनगर, साक्री रोड, धुळे) व अक्षय अहिरराव (२६, रा. सुरत बायपास, धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, तीन मोबाईल, बनावट देशी मद्याचे ६६ बॉक्स, तसेच बनावट मद्यासाठी लागणारे इसेन्स, वेगवेगळ रंग, नरसाळे, अल्कोहल मीटर, बनावट झाकणे, प्लॅस्टिक आवरणे व वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या बाटल्या, असा एकूण दोन लाख ६४ हजार १३२ किमतीचा मुद्देमाल जप्त झाला. 

जीवितास धोका
या प्रकरणी हवालदार किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून मानवी जीवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असतानाही बनावट मद्य तयार करून त्यांना कंपनीचे बनावट लेबल लाऊन नागरिकांसह कंपनीची फसवणूक केली, शासनाचा महसूल बुडविला, बेकायदेशीर वाहतूक करत असल्याने संशयित बाविस्कर, पाटोळे, अहिरराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक पी. एम. बनसोडे तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनासह एलसीबीचे निरीक्षक बुधवंत यांच्या निर्देशाने सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार संदीप थोरात, पोलिस नाईक कुणाल पानपाटील, हवालदार रवीकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, किशोर पाटील, श्रीशैल जाधव यांनी ही कारवाई केली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image