
धुळे जिल्ह्यात पावसाळ्यात सलग तीन महिने सातत्यपुर्ण पाऊस झाल्याने श्रावणातील कांदा लागवड झाली नाही. कांद्याची लागवड झाली नाही. कांद्याचे रोपसाठी बियाण्याची उगवण क्षमता घटल्याने रोपाची उपलब्धता घटली आहे.
कापडणे (धुळे) : धुळे तालुक्यात विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी यावर्षी वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी कांदा लावणीसाठी धडपडत आहेत. वीज भारनायमनाचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. एक आठवडा दिवसा व दुसरा आठवडा रात्री वीज असते. या नियोजनानुसार शेतकऱ्यांना कांदा लावणी करावी लागतेय. कांदा लावणीसाठी तरी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
धुळे जिल्ह्यात पावसाळ्यात सलग तीन महिने सातत्यपुर्ण पाऊस झाल्याने श्रावणातील कांदा लागवड झाली नाही. कांद्याची लागवड झाली नाही. कांद्याचे रोपसाठी बियाण्याची उगवण क्षमता घटल्याने रोपाची उपलब्धता घटली आहे.
रात्री अधिक दिवसा कमी मिळते वीज
शेतीसाठी एका आठवड्याला रात्री साडे आठ ते सकाळी साडे सहा पर्यंत वीज असते. दुसऱ्या आठवड्यात दिवसा असते. मात्र दिवसा सर्वच वीज पंप सुरु होतात. पुर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. पंप जळण्याचे प्रमाणही वाढते असते. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागत असते.
कांदा लावणीसाठी दिवसाच हवी वीज
वाफे तुडुंब भरुनच कांदा लागवड होत असते. चिखलातील लावणीच्या रोपांतून कांद्याचे उत्पादन अधिक होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. लावणी दिवसा अधिक सोयीस्कर असते. रात्रीच्या अंधारात लावणी शक्य नाही. लावणीसाठी तरी दिवसाच वीजेची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांवर अन्यायच?
औद्योगिक क्षेत्रासाठी वीज पुर्ण दाबाने अन चोवीस तास पुरविली जाते. विशिष्ट युनिटपर्यंत वीज मोफतही दिली जाते. शेतकऱ्यांना रात्री वीज पुरविणे हे अन्यायकारक आहे. दिवसाच वीज पुरविली पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, माजी अध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, नारायण माळी, भगवान पाटील, युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी आदींकडून होत आहे.