महाविकास आघाडी सरकारमधील वसुलीबाज वाझे शोधा-आशिष शेलार

Dhule Political News : राज्य सरकार केवळ खाण्यात गुंग असून सर्व व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.
MLA Ashish Shelar
MLA Ashish Shelar
Updated on
Summary

महाआघाडी सरकारची जनविरोधी धोरणे आणि भाजपच्या संघटनासाठी राज्य दौऱ्यावर आहे.


धुळे : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) वसुलीबाज वाझे शोधावेत, असे आव्हान भाजपचे माजी शिक्षणमंत्री व मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार (MLA Ashish Shelar)यांनी बुधवारी (ता.४) येथील पत्रकार परिषदेद्वारे विरोधकांना दिले. त्यांनी राज्य सरकारवर टीका, आरोपातून आसूड ओढले.

MLA Ashish Shelar
पाटणादेवी पितळखोरे लेणीतील यक्ष दिल्लीच्या संग्रहालयात


भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, उपमहापौर भगवान गवळी, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव आदी उपस्थित होते. श्री. शेलार म्हणाले, की महाआघाडी सरकारची जनविरोधी धोरणे आणि भाजपच्या संघटनासाठी राज्य दौऱ्यावर आहे. राज्य सरकार केवळ खाण्यात गुंग असून सर्व व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. पोलिस यंत्रणेचे खच्चीकरण केले जात असून अधिकारी बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार घडत आहेत. कायदा-सुव्यवस्थाही ठीकठाक नाही. राज्यात तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी, अशी स्थिती दिसते.

MLA Ashish Shelar
अनाथ बालकांना मदतीचा केवळ फार्स

ओबीसी आरक्षणावर गदा आणली

सरकारची प्रशासनावर पकड राहिलेली नाही. नेतृत्वात समन्वयाचा अभाव दिसतो. मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आणणारे हे सरकार आहे. आदिवासींच्या खावटीतही गैरप्रकार झाला आहे. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या विरोधात भाजपही आंदोलन छेडेल. मुंबई विमानतळ अदानींना देण्याचा ठराव महाआघाडी सरकारने केला आहे. यावरून विरोधकांचे बाहेर आंदोलन आणि आत हस्तांदोलन, अशी नीती आहे. केंद्रीय कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे श्री. शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com