esakal | धुळ्यात त्रस्त नागरिकांसाठी महापौरच करणार आंदोलन !  
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात त्रस्त नागरिकांसाठी महापौरच करणार आंदोलन !  

वैद्यकीय उपचारासाठी, विशेषतः ऑक्सिजन सुविधेसाठी विजेचा सुरळीत पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, अनियमित वीजपुरवठ्यामुळे उपचारात व्यत्यय येण्याचे प्रकार घडत आहेत.

धुळ्यात त्रस्त नागरिकांसाठी महापौरच करणार आंदोलन !  

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः शहरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. भाजपची जेव्हा सत्ता होती तेव्हा राज्यात वीजपुरवठा सुरळीत होता. परंतू आता वारंवार विज जात असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. सद्यःस्थितीत कार्यवाही झाली नाही, तर जनआंदोलन करू, असा इशारा महापौर चंद्रकांत सोनार यांनी दिला. 

शहरात सद्यःस्थितीत बहुतांश भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच अनेक भागात कोणतेही कारण नसताना अनियमित वीजपुरवठा केला जातो. परिणामी, ग्राहक त्रस्त आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यात अडचणी व व्यत्यय येत आहे. त्यामुळे महापालिकेला नागरिक आणि नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

विज खंडीतमुळे उपचारात येतो व्यत्यय

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांकडून वारंवार हात धुणे, आंघोळ, स्वच्छतेकामी पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी, विशेषतः ऑक्सिजन सुविधेसाठी विजेचा सुरळीत पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, अनियमित वीजपुरवठ्यामुळे उपचारात व्यत्यय येण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने तातडीने यथोचित उपाययोजना करून पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, भारतीय जनता पार्टीतर्फे वीज वितरण कंपनीविरोधात जनआंदोलन करू, असा इशारा महापौरांनी कंपनीच्या येथील अधीक्षक अभियंत्यांना दिला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top