esakal | आमदार फारुक शाह यांची मुंबईमध्ये अटकेनंतर सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Farooq Shah

आमदार फारुक शाह यांची मुंबईमध्ये अटकेनंतर सुटका

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील आमदार फारुक शाह (MLA Farooq Shah) यांनी सोमवारी मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर (Azad Maidan) समर्थकांसह आंदोलन (Movment) केले. यावेळी घोषणाबाजी करून निदर्शने झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी आमदार शाह यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. (dhule mla farooq shah movment police release after arrest)

हेही वाचा: शेतात कामाला गेलेल्या महिलेचा गळा चिरून खून


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. अधिवेशनावेळी आमदार शाह यांनी आपल्या समर्थकांसह मुस्लीम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत आझाद मैदान येथे बॅनर झळकावून आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश क्रमांक १४ दिनांक ९ जुलै २०१४ रोजी मुस्लीम समाजाला राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५(४), १५(५), १६(४) व ४६ मधील तरतुदीनुसार विशेष मागास प्रवर्ग अ निर्माण करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटाचा समावेश केला होता आणि ५० मुस्लीम मागास जातींना यामध्ये स्थान दिले होते. परंतु, शासनाच्या उदासीन धोरणामुळे मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप करीत धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी नागपूर अधिवेशनात मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती.

हेही वाचा: Photos:कच्चे पनीर खा..आणि लठ्ठपणा दुर करा!


याच पार्श्‍वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी विधानभवन मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या काळात मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळायलाच पाहिजे, याबाबत वंचित बहुजन आघाडीकडून झालेल्या आंदोलनात सहभाग घेत आमदार फारुक शाह यांनी आम्ही माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतो, असे सांगितले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्‍यांनी केले आणि धुळ्याचे आमदार फारुक शाह यांनी त्यात सहभाग घेतला. यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलन करणाऱ्‍या आमदार शाह यांच्यासह समर्थकांना अटक करत नंतर सुटका केली.

loading image