धुळेः चिखलातच लोळवू..शिवसेनेचा एमजेपी, मनपा अधिकाऱ्यांना इशारा

एमजेपी व महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागते.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation


धुळे ः शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रश्‍नी काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने (Shiv Sena) आक्रमक पवित्रा घेत या स्थितीला जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran) (एमजेपी) अधिकाऱ्यांना थेट वाडीभोकर रोड भागातील चिखलमय रस्त्यातून चालायला लावले. येत्या दहा दिवसांत या रस्त्यांची स्थिती सुधारली नाही, रस्त्यांप्रश्‍नी नागरिकांचे समाधान झाले नाही तर ‘एमजेपी’सह महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) अधिकाऱ्यांना चिखलात लोळवू, असा गंभीर इशाराही शिवसेनेने दिला.

Dhule Municipal Corporation
दोंडाईचाः अजब प्रकार..मृत व्यक्तीला कोरोनाचा दुसरा डोस


धुळे शहरातील रस्त्यांप्रश्‍नी नवरात्रोत्सवाच्या काळात महापालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करून प्रशासनाला कार्यवाहीस भाग पाडणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी वाडीभोकर रोडप्रश्‍नी तेथील व्यापारी व रहिवाशांच्या तक्रारीवरून आक्रमक भूमिका घेत एमजेपीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावून जाब विचारला.


अभियंत्यांना चालविले चिखलातून
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमजेपीचे उपअभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्या भागातील अभियंता पाटील यांना तेथे पाठविले. अभियंता पाटील यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील परिस्थिती दाखवत याला जबाबदार कोण, असा सवाल केला. श्री. पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले. एमजेपी व महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागते. असे पाणी तुम्हाला पाजले तर असे म्हणत पाण्याचा ग्लास श्री. पाटील यांना दिला. त्यांनी ते पाणी पिण्यास नकार दिला. श्री. पाटील यांना नंतर तेथील चिखलमय रस्त्यावरून चालवत समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

Dhule Municipal Corporation
जळगाव : एकनाथ खडसे, अनिल पाटील, रवींद्र पाटील बिनविरोध ?


...अन्यथा चिखलात लोळवू
अभियंता पाटील यांनी वरिष्ठांशी बोलून येत्या आठ दिवसांत काम करतो, असे सांगितले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आठ नको दहा दिवसांत काम करा, मात्र नागरिकांचे समाधान झाले नाही तर आज फक्त चिखलात चालवले आहे, दहा दिवसांनंतर एमजेपीसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चिखलात लोळवू, असा इशारा दिला. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, माजी सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख सतीश महाले, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, समन्वयक गुलाब माळी, उपजिल्हाप्रमुख धीरज पाटील, माजी महानगरप्रमुख संजय गुजराथी, चंद्रकांत गुरव, नितीन शिरसाठ, संजय वाल्हे, बाळू आगलावे, ललित माळी, पुरुषोत्तम जाधव, रामदास कानकाटे, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, भटू गवळी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com