धुळे पून्हा हादरले...दगडाने ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून ! 

भूषण श्रीखंडे
Saturday, 11 July 2020

शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या महाकाली मंदिर शेजारी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांना हा मृतदेह दिसला. ​

धुळे ः धुळे शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसून पून्हा एकदा धुळ्यात एका आज्ञात व्यकतीचा दगडाने ठेचून खुन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे धुळे शहर पुन्हा हादरले आहे. 

सर्वत्र कोरोनाचे महामारिचे संकटात प्रत्येक जण आपला जीव वाचविण्याचा प्रयत्नात आहे. परंतू धुळ्यात नेहमी प्रमाणे गुन्हेगारी वाढत असून एका अज्ञात व्यक्तीच्या दगडाने ठेचून खुन केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या महाकाली मंदिर शेजारी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांना हा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. मृतगदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. 

दुचाकी नदीत फेकली 
हत्या झालेल्या व्यक्तिची ओळख पोलिसांना पटू नये तसेच हत्या यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हा मारेकऱ्यांनी केल्याचे पोलिसांना दिसून आले. यात मृत व्यक्तीची दुचाकी मारेकऱ्यांनी दुचाकी मारेकऱ्यांनी नदी पात्रात फेकून दिल्याची पोलिसांच्या तपासात आढळून आले. 

हत्येचे गुढ.. 
पांझरा नदी किनारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हा कोणाचा, त्याची कोणी हत्या केली असे अनेक प्रश्‍न पोलिसांना पडले आहे. त्यामुळे पोलीस मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम करीत आहे. या खुनाच्या घटनेमुळे धुळे शहर चांगलेच हादरले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Murder of an unknown person by crushing a stone