esakal | धुळ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन झाला धोकादायक !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन झाला धोकादायक !

रस्ता खोदून ठेवल्याने, तर काही ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा पाहवेनाशी झाली आहे.

धुळ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन झाला धोकादायक !

sakal_logo
By
नितीन पाटील

नगाव ः धुळे जिल्ह्यातून नगाव येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक 3 ची अवस्था अतिशय बिकट झाली असून मोठ मोठे खड्डे महामार्गात पडलेले आहे. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातांची शृंखलाच येथे पाहायला मिळेत आहे.


मुंबई-आग्रा जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 03 आणि धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जाणारा महामार्ग. धुळे-सुरत राज्य या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांचे काम गेली अनेक वर्षांपासून चालू आहे. सदर दोन्ही रस्त्याचे काम खूपच संथ गतीने सुरू असल्याने आणि ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने, तर काही ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा पाहवेनाशी झाली आहे. याकडे लोकप्रतिनीधींचा देखील दुर्लक्ष असल्यामुळे ही अवस्था झाली आहे.


रस्त्याच्या कामाची गती वाढवणे गरजेचे
जागोजागी अपघातसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर बहुतांश ठिकाणी खड्डेमय रस्ता झाल्याने दुचाकीबरोबरच चार चाकी वाहनचालकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. धुळे येथे या दोन्ही रस्त्यांचा संगम होत असल्याने येथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यातच येथील धुळे जिल्ह्यात रस्ता खोदून ठेवल्याने अपघातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा सध्या होत असलेले आणि भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे तत्काळ बुजविणे आणि अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामाची गती वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी प्रवाशी व वाहनधारकांतून मागणी जोर धरत आहे.

खड्ड्यामूळे ट्रक उलटला  
नगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर मोठ्या खड्ड्यामध्ये ट्रक गेल्यामुळे हा ट्रक उलटून अपघात झाल्याची घटना घडली. यात घटनेत ड्रायव्हर व क्लिनर जखमी झाले. 

महत्वाच्याच्या शहराला जोडणारा मार्ग

राष्ट्रीय महामार्ग तीन हा अकराशे 1161 किलोमीटरचा असून मुंबई-आग्रा , इंदोर, धुळे, नाशिक, मालेगाव, शिरपूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडला जातो. 

टोल प्लाज़ा चे दुर्लक्ष

मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर वेगवेगळ्या ठेकेदारांकडून टोल प्लाझा निर्मिती करण्यात आलेली आहे त्या टोल दारे करोडो रुपयांचा रोड महसूल गोळा करण्यात येतो या महसूल तारे वेगवेगळ्या सुविधा प्रवाशांना देण्याचा करार झालेला आहे .महामार्ग हा वर्षातून नेहमी प्रवाश्यांसाठी सुयोग्य ,सुनियोजित,सोयी सुविधा युक्त बनवावा लागतो. या करारालाच हरताळ फासला गेला आहे.

गुजरात, राजस्थानची रहदारी वाढली 

अगोदर साक्री, नवापूर मार्गे जात होते. ते वाहन आता या राष्ट्रीय महामार्ग क्रमात ३ वरून जात आहेत. धुळे,साक्री ,नवापूर, सुरत हा राज्य महामार्ग खराब असल्याने या महामार्गावची वाहतुक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन चा आधार घेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ची रहदारी खूप वाढलेली आहे. संथ गतीने या ठिकाणी गाड्यांची वर्दळ होत आहे. त्यातच मोठमोठे खड्डे असुविधा यामुळे हा रस्ता धोक्याची घंटा बनलेला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे