esakal | लॉकडाउन नियमाचे उल्लंघन; साक्रीत तीन दुकाने सील

बोलून बातमी शोधा

dhule lockdown

लॉकडाउन नियमाचे उल्लंघन; साक्रीत तीन दुकाने सील

sakal_logo
By
टिम इ सकाळ

साक्री (धुळे) : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लागू केले असताना केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. मात्र या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य जे दुकाने सुरू राहत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील सुरू असलेल्या दुकानांवर या अनुषंगानेच आज तहसील कार्यालयाच्या पथकाने कारवाई करत ती सील केली. यात एक फोटो फ्रेम दुकान, फर्निचर साहित्याचे प्लायवूड दुकान तसेच सपना बूट हाऊस ही तीन दुकाने सील करण्यात आली. नायब तहसीलदार डॉ. अंगद असटकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांकडूनही कारवाई

दरम्यान महसूल व नगरपंचायत प्रशासनाकडून दुकानांवर तसेच विनापरवाना होणाऱ्या कार्यक्रमावर कारवाई करण्याचे सत्र सुरू असताना पोलिस प्रशासनाकडून देखील विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. यात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी थांबून विनाकारण फिरणाऱ्याला थांबवून विचारणा करत असून अनावश्यक फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.