esakal | संशयास्पद कार दिसली आणि सुरू झाला थरारर, जंगलात पाठलाग करून पाच दरोडेखोर गजाआड 
sakal

बोलून बातमी शोधा

संशयास्पद कार दिसली आणि सुरू झाला थरारर, जंगलात पाठलाग करून पाच दरोडेखोर गजाआड 

चालकासह इतर साथीदारांनी ट्रकमधून उड्या मारत पळण्याचा प्रयत्न केला. परिसरातील जंगल व अंधाराचा फायदा घेत पळणाऱ्यांचा पठलाग करून पोलिसांनी पकडले.

संशयास्पद कार दिसली आणि सुरू झाला थरारर, जंगलात पाठलाग करून पाच दरोडेखोर गजाआड 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः काही दिवसांपासून साक्री, पिंपळनेर, दहिवेल (ता. साक्री) परिसरातून बांधकामासाठी उपयुक्त लोखंडी सळई चोरीला जाण्याचे प्रकार वाढले. यात येथील मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रानमळा (ता. धुळे) येथील एका शैक्षणिक संस्थेच्या बांधकाम ठिकाणाहून सळई चोरीस गेल्या. हे प्रकार गांभीर्याने घेत तपासाअंती एलसीबीने बारा तासांत जंगलात पाठलाग करून पोलिसांनी पाच दरोडेखोरांना गजाआड केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना लोखंडी सळई चोरणारी टोळी बारडोली (गुजरात) येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाली. ती टोळी शुक्रवारी (ता. १३) पहाटे कार व ट्रकसह येथे दाखल झाली. त्यानुसार तपासासाठी पथके रवाना झाली. 

मध्यरात्रीनंतर संशयास्पद कार (जीजे १९, एएम ८६०१) सुरत- बायपास रोडवरील भंडारा हॉटेलसमोर उभी असल्याचे पोलिसांना दिसले. तपासणीत कारमध्ये रणजित गामीत (रा. कनाडा पिंपळाखडी, ता. सोनगड, जि. तापी) आढळला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने काही साथीदार रानमळा परिसरात लोखंडी सळई चोरण्यासाठी गेल्याचे सांगितले. गामितचे साथीदार ट्रकमध्ये सळई भरून साक्री- पिंपळनेरमार्गे बारडोली येथे जात असल्याची माहिती मिळाली. त्यांचा पाठलाग करत ट्रक दिघावे (ता. साक्री) शिवारात पोलिसांनी अडवला. चालकासह इतर साथीदारांनी ट्रकमधून उड्या मारत पळण्याचा प्रयत्न केला. परिसरातील जंगल व अंधाराचा फायदा घेत पळणाऱ्यांचा पठलाग करून पोलिसांनी संशयित कमलेश हरपट्टी (वय १९, रा. सिंगूर, ता. बारडोली, जि. सुरत), पठाण सुलतान खान युसूफखान (वय ३०, रा. मढी, ता. बारडोली, जि. सुरत), विलासभाई फत्तू (वय २८, रा. झरणपाडा, ता. उसल, जि. तापी), सुरेश काथुड (वय २८, रा. झरणपाडा, ता. उच्छल, जि. तापी) यांना ताब्यात घेतले. त्यांचे काही साथीदार पळून गेले. संशयितांच्या तपासणीत पाच मोबाईल, कार, ट्रक (जीजे १९, यू ४९८४), साडेचार हजार किलो लोखंडी सळई, असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला