esakal | धुळे जिल्ह्यात शंभरावर गुन्हेगार गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

Police

धुळे जिल्ह्यात शंभरावर गुन्हेगार गजाआड

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : जिल्हा परिषद (Zilla Parishad), चार पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकींतर्गत (Panchayat Samit Election) ) कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलिस (Police) प्रशासनाने बहुमोल कामगिरी केली. यात शंभरावर समाजकंटक, गुन्हेगारांना अटक, तर संशयितांकडून घातक शस्त्रे जप्त केली. ठिकठिकाणी छापेमारी करून अवैध मद्यसाठा, गांजाही जप्त केला. या प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (District Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..


जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस अधीक्षक पाटील यांनी सर्व पोलिस ठाण्यांसह वेगवेगळ्या शाखा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळी ऑल आउट ऑपरेशन राबविण्याची सक्त सूचना दिली. त्यात गुन्हेगारी वस्त्यांवर छापेमारीची सूचना दिली. ऑल आउट ऑपरेशनमध्ये स्वतः पोलिस अधीक्षक पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह तीन उपअधीक्षक, १७ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, एलसीबीचे अधिकारी व पथक सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर गुन्ह्यात पाहिजे असलेले व फरारी ३६ आरोपी, तर बिगर जामीनकीच्या वॉरंटमधील ६६ आरोपींना अटक केली.


जामीनकीच्या वॉरंटची ५४ जणांवर बजावणी केली. आर्म ॲक्टप्रमाणे चार अग्निशस्त्र व चार काडतुसे, पाच तलवारी जप्त केल्या. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये ठिकठिकाणच्या चार कारवायांमध्ये सहा लाख ४४ हजार ६५० किमतीचा गांजा, दारूबंदी कायद्यान्वये ३५ कारवायांमध्ये चार लाख ११ हजार ७८५ किमतीचा मद्यसाठा जप्त केला. जिल्हाभरात नाकाबंदीत ३१ ठिकाणी एक हजार ७३८ वाहने तपासली. तसेच हद्दपारीतील संशयित दोघांना ताब्यात घेतले. अधीक्षक पाटील, अपर अधीक्षक बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे, प्रदीप मैराळे, अनिल माने, एलसीबी निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह विविध पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली.

loading image
go to top