esakal | जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षावरील ७० टक्के नागरिकांचे जिल्ह्यात लसीकरण झाले आहे. लवकरच १० ते १८ वयोगटातील बालकांसाठी कोरोना लसीकरण (Corona Vaccination)रण्याचे काम सुरू आहे. सुमारे पाच लाख बालके या वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक (District Surgeon) डॉ. एन. एस. चव्हाण यांनी ‘सकाळ’ला दिली.

हेही वाचा: महिन्यानंतरही आपत्तीग्रस्तांची उपेक्षाच; आश्‍वासनेही फोल


जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख ७५ हजार ३६७ नागरिकांना लसीकरण झालेले आहे. आतापर्यंत एकूण बाधीत झालेल्यांची संख्या १ लाख ४२ हजार १०९ आहे. पहिला डोस घेतलेल्यांमध्ये १७ लाख ९० हजार ८९२ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ४७५ आहे. आतापर्यंत कोरोनाने २५७५ मृत्यू झालेले आहेत.कोरोनावर लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. यामुळे लसीकरणासाठी सर्वत्र गर्दी होताना दिसते. लवकरच केंद्र शासनातर्फे लहान मुलांसाठीची (१० ते १८ वयोगट) लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने वयोगटानूसार माहिती संकलीत करणे सुरू केले आहे. कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या भागात कमी संख्या आहे त्यानूसार लसीकरणाचे नियोजन सुरू आहे. सध्या ज्या ठिकाणी केंद्रे आहेत त्याच ठिकाणी लस द्यावयाची की लहान बालकांसाठी वेगळी लसीकरण केंद्रे सुरू करावयाची याबाबत निर्णय होणे बाकी आहे. बालकांच्या वयोगटातील डेटा तयार करून तो केंद्र शासनाला पाठविला जाईल.

हेही वाचा: अन् मुख्याध्यापकाचा प्रत्येक दिवस बनला ‘नो व्हेईकल डे’

सह आजार असणाऱ्यांना अगोदर लस
दहा ते अठरा वयोगटातील ज्या बालकांना इतर सह आजार आहेत त्यांना अगोदर लस दिली जाईल. त्यानंतर इतर बालकांना लस देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र शासनाकडून बालकांसाठीच्या लस उपलब्ध झाल्यास लगेच लसीकरण सुरू होईल. यामुळे बालकांना शाळा, महाविद्यालयात कोरोना संसर्गाचा धोका राहणार नाही.

loading image
go to top