बंद घरात गुटख्याचे घबाड, पोलिसांनी टाकला रात्री छापा आणि सापडला पाच लाखा माल

रमाकांत घोडराज
Tuesday, 1 December 2020

छापा टाकला्‌ त्यावेळी घराजवळ उभा असलेला एक व्यक्ती घरात घुसला व त्याने आतून दरवाजा बंद केला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला आवाज दिला.

धुळे  ः शहरातील अंबिकानगरमधील एका बंद घरातून पोलिसांची काल (ता.३०) रात्री अकराच्या सुमारास चार ते पाच लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आवश्य वाचा-  अंगावर साधी जखम नाही तरी बिबट्याचा मृत्यू ? -

शहरातील अंबिका नगरमध्ये एका बंद खोलीत गुटख्याचा साठा असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने काल (ता.३०) रात्री अकराच्या सुमारास तेथे छापा टाकला्‌ त्यावेळी घराजवळ उभा असलेला एक व्यक्ती घरात घुसला व त्याने आतून दरवाजा बंद केला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला आवाज दिला. त्याने दरवाजा उघडल्यावर तेथे अजून एक व्यक्ती असल्याचे आढळून आले. त्याचे नाव अय्युब रशीद खाटीक (वय- ५४, रा. नॅशनल हायस्कूल, खडीपट्टी, धुळे) असे सांगितले. घरात तपासणी केली असता गुटख्याचा साठा आढळून आला. खाकी रंगाच्या मोठ्या १३ गोण्यांमध्ये विमल पान मसाला, पांढऱ्या रंगाच्या १३ गोण्यामध्ये व्ही-१ तंबाखू व काही अर्धवट भरलेल्या गोण्यामध्येदेखील विमल व व्ही-१ तंबाखू साठा आढळून आला. चार ते पाच लाखांचा गुटखा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अय्युब रशीद खाटीक याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आवश्य वाचा- गायत्री मंत्राला मद्यप्राशसनाशी जोडणारे विडंबन भोवले; गुजरातचा अभिनेतासह ५ जणांविरोधात पोलिसात तक्रार

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, प्रेमराज पाटील,, अजिज शेख, भुरा पाटील, सुशील शेंडे, स्वप्निल सोनवणे, किरण राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule police seized gutka worth five million from a locked house