esakal | धुळे तालुक्यातील सर्वच जलसाठे ओसंडले; समाधानकारक पावसाने दिलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे तालुक्यातील सर्वच जलसाठे ओसंडले; समाधानकारक पावसाने दिलासा 

दहा- पंधरा वर्षांनंतर जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. पिकेही तरारली आहेत. शेती शिवारातील सर्वच लहान- मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत.

धुळे तालुक्यातील सर्वच जलसाठे ओसंडले; समाधानकारक पावसाने दिलासा 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे तालुक्यात  जवळपास वीस वर्षांनंतर प्रथमच समाधानकारक पाऊस पडत आहे. मृगातच पेरण्या झाल्या. पिकांची वाढ जोमाने सुरू आहे. जिल्ह्यातील पंधरा धरणे अथवा प्रकल्पातील जलसाठा समाधानकारक आहे. मात्र सोमवारी (ता. ३) देवभाने धरण ओसंडल्यानंतर धुळे तालुक्यातील सर्वच लहान-मोठी पंधरा धरणे व तलावातील साठा शंभर टक्के झाला. प्रथमच अक्कलपाड्याच्या पाण्याविना तालुका जलमय झाला आहे. 

तालुक्यात कनोली प्रकल्प प्रथम ओव्हरफ्लो झाला. त्यानंतर जुलैमध्ये मुकटी, पुरमेपाडा, डेडरगाव, नकाणे, एमआयडीसी टँक, गोंदूर, सोनगीर व निमडाळे तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाले. आता देवभाने धरणही ओसांडून वाहू लागले आहे. तालुक्यातील जवळपास पंधरा लहान-मोठे जलाशय ओसंडून वाहत आहेत. 

...अन्यथा असायची अक्कलपाड्यावर भिस्त 
साक्री तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर अक्कलपाडा धरण भरायचे. त्यानंतर नकाणे, निमडाळे व गोंदूर तलाव पाटचारी व कालव्याने भरण्यास सुरवात व्हायची. ते भरल्यानंतर अर्ध्या तालुक्याचा पाणीप्रश्न संपुष्टात यायचा. आता प्रथमच वरुणराजाने तालुका अक्कलपाड्याशिवाय जलमय केला आहे. दहा- पंधरा वर्षांनंतर जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. पिकेही तरारली आहेत. शेती शिवारातील सर्वच लहान- मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. विहिरी व कूपनलिकांची पातळी वाढली आहे. केवळ दहा फूट दोरानेही पाणी काढता येईल, अशी स्थिती आहे. साक्री व शिंदखेडा तालुक्यांतील स्थिती अद्यापही समाधानकारक नाही. तर दर वर्षी क्रमांक एकला असलेल्या शिरपूर तालुक्यात बऱ्या‍पैकी पाऊस पडतोय. नेर 


प्रकल्प व त्यांच्यातील ३ ऑगस्टपर्यंतचा जलसाठा 

प्रकल्पधरण.... ३ ऑगस्टचा २०२०(साठा)…. ३ ऑगस्‍ट २०१९ (साठा).टक्के 

पांझरा    २६.२४    /  ९३.० 
मालनगाव  ३७.६० / ९९.९८ 
जामखेडी    १३.४३ / १०० 
कनोली       १०० /    ०० 
बुराई          ९६.९७ / १९.७४ 
करवंद        ८६.४०  / २२.०२ 
अनेर           २८.७८ / १७.४३ 
सोनवद        ६३.५८  / ०० 
अक्कलपाडा  ३१.७३ / १५.८४ 
वाडी शेवाडी   ५५.९७ / ०० 
अमरावती       ४९.३८ / ८.४२ 
सुलवाडे          ००  /  ७.१९ 
धुळे मध्यम प्रकल्प ३५.५४ / २४.८८ 
मुकटी      १००   / ८.५४      

धुळे जिल्हा एकूण जलसाठा ४०.९२  / २०.२० 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image